अखेर माहुर्ले निलंबित

0
14

गोंदिया- गोंदिया व तिरोडा शहरातील डाकघरातील आरडी-एसबी घोटाळ्याचे वृत्त बाहेर येताच संपूर्ण पोस्टल खाते चांगलेच हादरले. याविषयी चौकशीला सुरवात झाली असून या प्रकरणातील संबंधित माहुर्लेे नामक अधिकाèयाला सेवेतून निलंबित करण्यात आले आहे. याविषयी सर्वप्रथम साप्ताहिक बेरारटाईम्सने वृत्त प्रकाशित केले होते.
सविस्तर असे की, गोंदिया डाकघरातून बदलून गेल्या काही दिवसापूर्वी तिरोडा येथे स्थानांतरीत झालेले माहुर्ले नामक पोस्टल अधिकारी यांच्या आरडी-एसबी घोटाळ्याची चर्चा पोस्टल वर्तुळात चांगलीच रंगली आहे. सध्या पोस्टल कर्मचाèयांच्या संघटनेच्या निवडणुका लवकरच होणार असल्याने अनेक पोस्टल युनियनचे कर्मचारी-अधिकारी एकमेकांवर कुरघोडीच्या प्रयत्नात असल्याने हे प्रकरण बाहेर आले असण्याची शक्यता आहे. यामुळे गोंदिया येथे संबंधित अधिकाè यांचे घोटाळा प्रकरण उरकून काढण्यात आले आहे. पोस्टाचे नियमानुसार, आरडी खात्यातील परिपक्वता राशी २० हजारावर असल्यास चेक वा बचत खात्यातून खातेदाराला देण्याचे नियम आहेत.
माहुर्ले हे संबंधित आरडी खात्यातील रकमेत वाढ ही हजाराच्या पटीत करीत असत. आरडी परिपक्व होण्याच्या आधी माहुर्ले हे खातेदाराच्या नावे बनावट बचत खाते १०-१५ दिवसापूर्वीच उघडून त्याद्वारे लाखोची उलाढाल एका दिवसात करीत असल्याचे सूत्रांचे म्हणणे आहे. यामाध्यमातून गोंदिया पोस्टात कोट्यवधी रुपयाची अफरातफर केली. उल्लेखनीय म्हणजे माहुर्ले यांनी खातेदाराचे पूर्ण पैसे परत करून फक्त पोस्टखात्याला चुना लावला आहे.
तिरोडा येथे स्थानांतरीत झाल्यावर तेथे त्याच धर्तीवर माहुर्ले यांनी तेथेही घोटाळा झाल्याची चर्चा आहे. हे वृत्त प्रकाशित होताच पोस्टाच्या वरिष्ठ अधिकाèयांनी तिरोडा येथे चौकशी केली. याविषयी माहुर्ले यांना तातडीने गेल्या मंगळवारी (१० मार्च) निलंबित करण्यात आले आहे.
दरम्यान, गेल्या गुरुवारी गोंदियातील दोन कर्मचाèयांना विभागीय कार्यालयात हलविल्याचे सांगण्यात येते. उल्लेखनीय म्हणजे ज्या पोस्टल अधिकाèयांवर हे प्रकरण शेकण्याची शक्यता वर्तविली जात आहे, तेच अधिकारी चौकशी करीत असल्याने सदर प्रकरण दाबले जाण्याची पूर्ण शक्यता असल्याचे बोलले जात आहे.
सदर प्रकरण वरिष्ठ अधिकाèयांवर शेकण्याची दाट शक्यता असल्याने चौकशी योग्य पद्धतीने न करता अत्यंत गोपनीयता राखली जात आहे. वरिष्ठ अधिकाèयांच्या आशीर्वादाशिवाय हे शक्य नाही, असे पोस्टातील सूत्रांचे म्हणणे आहे. चौकशीतील शिथिलपणामुळे माहुर्ले यांना घोटाळ्यातील रकमेची विल्हेवाट लावण्याला संधी मिळत असल्याचेही तर्क दिले जाते आहेत. यामुळे योग्य चौकशी करून या प्रकरणातील सत्य बाहेर आणून शासकीय पैशाची खरेच अफरातफर झाली का? हे पोस्टखात्याच्या वरिष्ठ अधिकाèयांनी जनतेसमोर ठेवण्याची मागणी होत आहे.
दरम्यान डोंगरगाव येथील शाखा डाकपाल यांनी आपला या प्रकरणाशी काहीही संबंध नसून विरोधक आपल्याला बदनाम करण्यासाठी नावाचा वापर करित असल्याचे सांगितले. एप्रिलमध्ये होऊ घातलेल्या पोस्ट कर्मचारी पतसंस्थेच्या निवडणुकीत संभाव्य पराभव बघूनच आपल्यावर चुकीचे आरोप करुन बदनामी केली जात असल्याचे म्हटले आहे.
भंडारा-गोंदिया लोकसभा मतदार संघाचे खासदार नाना पटोले यांनी पोस्टातील या घोटाळा प्रकरणाची दखल घेतली असून केंद्रीय दुरसंचार मंत्र्याकडे पत्र व्ङ्मवहार करुन चौकशी करण्याची मागणी करण्यात येणार असल्याचे कळविले आहे.