भष्ट्राचारमुक्त व पारदर्शक प्रशासनासाठी परिवर्तन पॅनल-पी.जी.शहारे

0
23

गोंदिया-गोंदिया जिल्हा परिषद व पंचायत समिती कर्मचारी सहकारी पतसंस्था मर्या.गोंदियाच्या येत्या काही दिवसात होऊ घातलेल्या निवडणुकीत परिवर्तन पॅनल विद्ममान सत्ताधारी पॅनलच्या विरोधात रिंगणात उतरणार आहे.परिवर्तन पॅनल संस्थेच्या सभासदाना भष्ट्राचारमुक्त व पारदर्शक प्रशासन देण्यासाठी कट्टीबध्द असल्याची माहिती पॅनलचे संयोजक पी.जी.शहारे यांनी पत्रकारपरिषदेत दिली. फूलचूर येथे परिवर्तन पॅनलच्या कार्यालयाच्या शुभारंभप्रसंगी आयोजित पत्रकार परिषदेत त्यांनी ही माहिती दिली. पॅनलच्या कार्यालयाचे उदघाटन राज्य कर्मचारी मध्यवर्ती संघटनेचे सरचिटणीस लिलाधर पाथोडे यांच्या हस्ते पार पडले. यावेळी पॅनलच्यावतीने २१ पैकी १९ उमेदवारांच्या नावाची घोषणा सुध्दा करण्यात आली.शहारे यांनी सांगितले की,सचिव पदासाठी पी.जी.शहारे ,जिल्हास्तर संचालकासाठी वासुदेव रामटेककर, डॉ.किशोर मुळे, विजय मडावी, मंजूषा चौधरी, स्नेहल वाटकर, शंकूतला शिवणकर, युवराज वाघमारे, जयश्री नंदेश्वर,जिल्हा परिषद मुख्यालय स्तरावरील उमेदवार आलोक देसाई,मनोज मानकर,तर तालुकास्तर उमेदवारात प्रवीण इखार,सुखराम गोंधुळे,महेंद्र उके,संतोष अग्रवाल,संजू मेश्राम,श्याम समरीत यांचा समावेश आहे.
सत्ताधारी संचालकानी संस्थेच्या पैशाचा गैरवापर करीत स्वतःच्या नातेवार्इंना नौकरी लावून सभासदांची दिशाभूल केल्याचेही शहारे म्हणाले.संस्थेच्या निवडणुका झाल्यानंतर अवघ्या पाच महिन्यातच संस्था सचिव व संचालकांनी आपल्या नातेवाइकांना नोकरीवर लावून हुकूमशाहीपणा अवलबविल्याचा आरोप केला.इमारत बांधकामाची गरज नसतानाही ४० लाख रुपये खर्च करून इमारतीचे बांधकाम केल्याचेही त्यांनी सांगितले.सदस्यांची मागणी नसताना त्यांच्याकरिता भेटवस्तू म्हणून बॅग खरेदी करणे,आवश्यकता नसताना कर्मचारी भरती करणे,शेअर्स मर्यादा वाढविणे,महाग फर्निचर खरेदी करणे,विद्युत बिल संकलन केंद्रसारखी तोट्याची केंद्रे सुरू करणे,अपघात विमा काढून लाखो रुपयाचे कमीशन फस्त करणे,सडक अर्जुनी येथे शाखा उघडून अनावश्यक खर्च करणे,अभ्यास दौèयाच्या नावावर संस्थेचा निधी उडविणे अशा अनेक गोष्टी विद्यमान संस्थाचालकानी करून संस्थेला नुकसान पोचविण्याचे काम केल्याचे सांगितले.गेल्या पाच वर्षात संस्था ही जीडीसीसी बँकेची थकीतदार अनेकवेळा राहिल्याने बँकेकडून संस्थेला कर्ज देणे सुध्दा बंद झाले आहे. त्यामुळे सभासदाना कर्ज मिळण्यास अडचणी जात असून गेल्या २ महिन्यापासून कर्ज वाटप प्रकिया बंद करण्यात आल्याचेही शहारे यांनी सांगत या सर्व गोष्टीपासून सभासदाना न्याय मिळावा व त्यासोबतच भष्ट्राचारमुक्त व पारदर्शक प्रशासनासाठी आमची पॅनल विजय सुध्दा मिळवेल असा आशावाद त्यांनी व्यक्त केला. यावेळी इंजी. वासुदेव रामटेककर, मंजूषा चौधरी, मनोज मानकर, आलोक देसाई, स्नेहल वाटकर, शंकूतला वाघमारे, विजय मडावी, डॉ.किशोर मुळे, आंबेकर, अर्चना आयचित, इंजि.ठवकर उपस्थित होते.