आमदारांच्या हस्ते करा शासकीय झेंडावंदन

0
14

मुंबई – विधानसभेत काही आमदारांनी स्वातंत्र्यदिनी तसेच शासकीय कार्यक्रमात ध्वजवंदन आमदारांच्या हस्ते करण्याची मागणी केली होती. राज्य शासनाने या मागणीवर सकारात्मक निर्णय घेतला असून त्यानुसार यासंदर्भात महाराष्ट्र दिन १ मे पूर्वी शासन निर्णय काढण्यात येईल, असे मुख्यमंत्र्यांनी काल विधानसभेत सांगितले.

सामान्य प्रशासन विभागाच्या पुरवणी मागण्याच्या चर्चेत शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी याबाबतची मागणी केली होती. या मागणीबाबत बहुतांश आमदारांचे समर्थन असल्याचे, सांगत मुख्यमंत्र्यांनी ही मागणी मान्य केली. याबरोबरच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आगामी सेवा हमी कायद्यात १५० सेवांचा पहिल्या टप्प्यात समावेश असल्याची घोषणा केली.