सीबीआयने उघड केला रेल्वे मालवाहतुकीतला घोटाळा

0
6

नवी दिल्ली : सीबीआयने रेल्वेच्या मालवाहतुकीत चार हजार कोटींचा वजनी घोटाळा झाल्याचे उघड केले आहे. या प्रकरणी सीबीआय लवकरच गुन्हे दाखल करणार आहे.

घोटाळ्याची शंका येताच सीबीआयच्या किमान ५०० अधिका-यांनी मोहीम उघडत देशात किमान ६५ ठिकाणी एकाचवेळी छापे टाकले. छाप्यांमध्ये मालभाड्याशी संबंधिक अनेक गैरप्रकार आढळून आलेत, अशी माहिती सीबीआयच्या प्रवक्त्याने दिली. हा हजारो कोटींचा घोटाळा असल्याचा संशय सीबीआयने व्यक्त केला आहे.

२०१२-१३ या आर्थिक वर्षात १००८ दशलक्ष मेट्रिक टन मालाची वाहतूक झाली. आणि त्यातून ८५ हजार २६२ कोटींचा महसूल रेल्वेला मिळाला. हा निधी रेल्वेच्या एकूण महसुलापैकी ६७ टक्के इतका आहे. डब्यांमध्ये माल लादण्यात आलेले रेल्वे स्थानक आणि माल पोहचवण्यात येणारे रेल्वे स्थानक किंवा दरम्यानच्या रेल्वे स्थानकांमध्ये मालाचे वजन तपासण्याची गरज आहे. तरच रेल्वेला होणारे नुकसान रोखता येईल, अशी सुत्रांची माहिती आहे.

कागदोपत्री दाखवलेल्या मालापेक्षा जास्त मालाची वाहतूक मालगाडीच्या डब्यांमधून करण्यात आली आहे. आणि हा जास्तीचा माल एक नव्हे तर अनेक रेल्वे स्थानकांवरून मालगाडीत ठेवला जात होता. रेल्वे मालवाहतुकीच्या सिस्टीम सॉफ्टवेअरशीही छेडछाड करून आधुनिक पद्धतीने गैरप्रकार केलेल गेले आहेत. रेल्वेचे अधिकारी, कंटड्ढाटदार आणि मालाची चढ-उतर करवणारे ऑपरेटर यांच्या संगनमतातून हा घोटाळा झाल्याचे सीबीआयच्या अधिका-यांचे म्हणणेआहे.