मध्य प्रदेशात 35 प्रवाशांचा होरपळून मृत्यू

0
10

वृत्तसंस्था
भोपाळ- मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात सोमवारी दुपारी एक खासगी बस दुर्घटनेची शिकार झाली. चालकाचा वाहनावरील ताबा सुटून बस पुलावरून खाली कोसळली. बस उलटताच तिला भीषण आग लागली. या आगीत 35 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे 12 जण गंभीर जखमी झाले आहेत.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अनूप ट्रॅव्हल्सची बस दुपारी 12 वाजून 40 मिनिटांनी छतरपूरहून पन्नाला रवाना झाली. दोन वाजेच्या सुमारास बस पांडा धबधब्याजवळ पोहोचली. पुलावरून जाताना चालकाचा बसवरील ताबा सुटला आणि बस पुलाखाली उलटली. बस कोसळताच भीषण आग लागली. या दुर्घटनेत 35 प्रवाशांचा होरपळून मृत्यू झाला आहे. जखमींना पन्ना येथील रुग्णालयात हलवण्यात आले आहे. मृतांचा आकडा वाढण्याची भीती जिल्हाधिकारी शिवनारायण चौहान यांनी वर्तवली आहे. पशुसंवर्धन मंत्री कुसुम मेहंदेळे यांनी घटनास्थळाची पाहाणी केली.
मुख्यमंत्री शिवराज चौहान यांनी बस दुर्घटनेची न्यायालयीन चौकशीचे आदेश दिले आहेत. तसेच प्रत्येक मृताच्या वारसाला 2 लाख, गंभीर जखमीला 50 हजार तर सामान्य जखमीला 25 हजार रुपयांची मदत जाहीर केली आहे.