शरद पवारांनी राज्यसभेत विचारले दाऊद कुठे आहे ?

0
9

नवी दिल्ली, दि. ५ – कुख्यात डॉन व मुंबई बाँबस्फोटासारख्या महत्त्वाच्या खटल्यातील आरोपी दाऊद इब्राहिमचा ठावठिकाणा आपल्याला माहित नसल्याचे सांगत केंद्र सरकारने सपशेल घुमजाव केले आहे. याआधी सत्तेत नसताना व नंतर सत्तेत आल्यानंतरही भाजपाप्रणीत केंद्र सरकारने दाऊद पाकिस्तानात लपल्याचे सांगितले होते. विरोधात असताना तर १५ दिवसांमध्ये दाऊदच्या मुसक्या वळवून त्याला भारतात आणू असे वक्तव्यही भाजपाचे नेते उच्चारवाने केले होते.मात्र आज मंगळवारी, दाऊदच्या ठावठिकाण्याबाबत भारत सरकारला अजिबात कल्पना नसल्याचे केंद्रीय गृहमंत्रालयाने संसदेत स्पष्ट केले आहे.
अंडरवर्ल्ड डॉन संबंधीच्या प्रश्नावर संसदेत गृह राज्यमंत्र्यांनी माहिती दिली. ते म्हणाले, मोस्ट वाँटेड दाऊद इब्राहिम कासकर सध्या भारतीय तपास यंत्रणेच्या रडारवर नाही. तो कुठे आहे याबद्दल सरकारकडे कोणतीही माहिती नाही. ते म्हणाले, ‘जेव्हा त्याचे लोकेशन कळेल तेव्हाच त्याच्या प्रत्यार्पणाची तयारी केली जाईल.’ मुंबईत 12 मार्च 1993 रोजी साखळी बॉम्बस्फोट झाले होते. त्यात दाऊद मुख्य आरोपी आहे. मुंबईत 13 ठिकाणी झालेल्या स्फोटांमध्ये 257 लोक ठार आणि 700 जखमी झाले होते.
नीरज कुमार यांच्या कारकिर्दीवर प्रकाश टाकणारे पुस्तक लवकरच प्रकाशित होत आहे. त्या पार्श्वभूमीवर एका वृत्तपत्राला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी दाऊद‍ इब्राहीमविषयी गौप्यस्फोट केला.
‘डी-कंपनी’च्या नावाने दाऊद मुंबईत काळे धंदे करत होता. भारतासह अनेक देशात त्याचे जाळे पसरले आहे. मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट मालिकेतील प्रमुख आरोपी आहे.