जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांची स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींशी चर्चा

0
6

गोंदिया,दि.5 : जिल्हाधिकारी डॉ.विजय सूर्यवंशी यांनी त्यांच्या कक्षात २ मे रोजी गोंदिया जिल्ह्यातील विविध स्वयंसेवी संस्था प्रतिनिधींशी चर्चा केली. यावेळी संस्थेचे कालुराम अग्रवाल, शरद क्षत्रीय लॉयंस क्लब गोंदिया, लॉयंस क्लब ग्रीन सिटीचे अपुर्व अग्रवाल, निर्मल अग्रवाल, लॉयंस क्लब संजीवनीचे प्रतिक कदम, लॉयंस क्लब गोंदिया (रॉयल) निखील अग्रवाल, जेसीआय गोंदिया सेंट्रलचे गौरव बैस, लॉयंस क्लब गोंदिया (सिव्हील) दिपक कदम, डी.यु.रहांगडाले, किरीट शाह, लॉयंस क्लब (राईस सिटी) संतोष भेलावे आदी उपस्थित होते.
यावेळी जिल्हाधिकारी डॉ.सूर्यवंशी यांनी स्वयंसेवी संस्थांशी चर्चा करुन जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबिराचे आयोजन करणे, राज्य शासनाचा महत्वाकांक्षी कार्यक्रम असलेल्या जलयुक्त शिवार अभियानामध्ये गावातील नागरिकांना प्रेरीत करुन लोकसहभाग वाढविण्यासाठी शिबिराचे आयोजन करणे. नाला खोलीकरण करण्यासाठी जेसीबी भाड्याने उपलब्ध करुन देणे, डेअरी, कुकूटपालन, फुलांचे उत्पादन वाढविणे, प्राथमिक आरोग्य केंद्रामध्ये सुधारणा, रेल्वेच्या लाईफ लाईन आरोग्य शिबिरामध्ये सहभागी होणे, नेत्रदान व देहदान यामध्ये शासकीय यंत्रणांचा सहभाग मिळवणे आदी विषयावर सकारात्मक चर्चा करण्यात आली.