भाजप सरकार संघाचे विचार देशावर लादत आहे, राहुल गांधींचा आरोप

0
7

नवी दिल्ली दि.२८- – काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर हल्ल्याचे सत्र सुरुच ठेवले आहे. बुधवारी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी माजी पंतप्रधान डॉ. मनमोहनसिंग यांची भेट घेतली होती. त्यावरून राहुल यांनी पंतप्रधान मोदींना चिमटा काढला, की त्यांनी अर्थतज्ज्ञ डॉ. सिंह यांच्याकडून अर्थववस्था कशी चालवयी याचे धडे घेतले आहेत. तसेच काँग्रेस उपाध्यक्षांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघावरही जोरदार हल्ला केला. संघ त्यांची विचारधारा देशावर लादण्याचा प्रयत्न करत असल्याचे ते म्हणाले.
नॅशनल स्टुडंट युनियन ऑफ इंडिया (एनएसयूआय) च्या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. ते म्हणाले, काँग्रेसचा शिस्तीवर भर आहे. गेल्या दहा वर्षात मला कळाले की, आपली संघटना प्रत्येकाचा आवाज ऐकण्याचा प्रयत्न करते. कारण ते आपल्या डीएनए मध्ये आहे. आपली ताकद ही अंतर्गात संवादामध्ये आहे.
संघावर टीका करताना राहुल गांधी म्हणाले, ‘संघात कोणालाही प्रश्न विचारण्याची मुभा नाही. संघाच्या शाखेत सगळे रांगेत उभे राहून जे सांगितले जाते ते केवळ ऐकून घेतात. सरकारमध्येही सध्या तेच सुरु आहे. दशावर संघाची विचारसरणी लादण्याचा प्रयत्न केला जात आहे. त्याचे उदाहरण म्हणजे शिक्षण क्षेत्रात संघाशी संबंधीत लोकांचा हस्तक्षेप वाढला आहे.’ राहुल गांधी यांनी युवकांना आवाहन केले, की जिथे संघाचा हस्तक्षेप वाढल्याचे दिसेल तिथे आवाज बुलंद केला पाहिजे.
देशाच्या अर्थव्यवस्थेबद्दल चिंता व्यक्त करताना त्यांनी मोदींना टोला लगावला. मोदींनी डॉ. मनमोहनसिंह यांच्याकडून अर्थव्यवस्था कशी चालवायची याचे धडे घेतल्याचे ते म्हणाले.