जिल्ह्याती 4 एसडीपीओंच्या बदल्या

0
19

गोंदिया,दि.28 : राज्य शासनाने राज्यातील ८८ पोलीस उपअधीक्षक तथा सहायक आयुक्तांच्या बदल्या बुधवारी जाहीर केल्या. या बदल्यांमध्ये गोंदिया जिल्ह्यातील 4 ,भंडारा जिल्ह्यातील 2 उपविभागीय पोलिस अधिकारी यांच्यासह पुणे शहर पोलीस दलासह अन्य यंत्रणांमधील एकूण दहा पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या झाल्या आहेत. गोंदियाचे उपविभागीय पोलीस अधिकारी अशोक नखाते यांची मालेगाव ग्रामीण,देवरीचे गजानन राजमाने यांची मालेगाव शहर,आमगावचे अजय देवरे,आणि तिरोडाचे गिरे यांची सुध्दा बदली झाली आहे.या चारपैकी फक्त तिरोडा येथे गडचिरोली मुख्यालयातील देवीदास इलमकर यांना पाठविण्यात आले आहे.तर गोंदिया,आमगाव व देवरी हे महत्वाचे स्थळ असतानाही रिक्त ठेवण्यात आले आहे.विशेष म्हणजे आमगाव व देवरी नक्षलग्रस्त ठिकाण असलेले विभाग आहेत.
सहायक पोलीस आयुक्त राजेंद्र भामरे (उपविभागीय अधिकारी, वाशिम), रमेश गायकवाड (सहायक आयुक्त, औरंगाबाद), राजन भोगले (लाचलुचपत प्रतिबंधक विभाग), गोपीनाथ पाटील (सहायक आयुक्त, सोलापूर), राजेंद्र साळुंखे (उपविभागीय पोलीस अधिकारी, मलकापूर), जगदीश लोहळकर (एसआयडी), शिवकुमार निपुणगे (लोहमार्ग पुणे ते सीआयडी पुणे), सतीश पाटील (पीएडब्ल्यू ते औरंगाबाद), राजेंद्र धांदले (सीआयडी ते रायगड) अशी बदलून गेलेल्या अधिकाऱ्यांची नावे आहेत. पुण्यामधून बदलून गेलेल उपायुक्त राजेश बनसोडे यांची श्रीरामपूर येथे झालेली बदली रद्द करून, त्यांची कोल्हापूर सीआयडीमध्ये बदली करण्यात आली आहे. तर, पुणे सीआयडीच्या गुन्हे शाखेचे अधीक्षक म्हणून डी. वाय. मंडलिक यांची नेमणूक करण्यात आली आहे.