भंडारा जिल्ह्यात 4 संशयीत रुग्ण,आरोग्य विभागाची नजर

0
1521

भंडारा,दि.१६~राज्यात कोरोनाचा प्रभाव सातत्याने वाढत असून भंडारा ,लाखनी,तुमसर येथील शारजा,युएसए,दोहा अरबिया येथून परतलेल्या ८ जणांची माहिती जिल्हा आरोग्य विभागाकडे प्राप्त झाली आहे.त्यापैकी 4 जण संशयीत रुग्ण असल्याने त्यांना त्यांच्याच घऱी निगरानीत ठेवण्यात आले असून इतरांशी संपर्क टाळण्याचे सुचना करण्यात आले आहेत.हे 4 संशयीत तुमसर तालुक्यातील आहेत.त्यांचे रक्ताचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठविण्यात येणार आहे.

महाराष्ट्रात सोमवारी कोरोनाचे 5 नवे रुग्ण सापडले. यासोबतच, राज्यात एकूण कोरोनाग्रस्तांची आकडेवारी 38 झाली आहे. यात पुणे, मुंबई आणि औरंगाबादच्या एका नवीन रुग्णाचा समावेश आहे. आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी पत्रकारांना राज्यातील परिस्थितीची माहिती देताना सांगितले की, वैद्यकीय नमुने तपासणीसाठी राज्यात लॅबची संख्या वाढवण्यात येत आहे.१४ मार्च रोजी दगावलेल्या एका रुग्णाचा अहवाल निगेटिव्ह आला असून त्याचा मृत्यू श्वसनसंस्थेच्या आजारामुळे झाला आहे. सौदीतून मुंबईत आल्यावर एक वृद्ध दांपत्य गावाकडे गेले. यातील वृद्धास मधुमेह, रक्तदाब व श्वसनविकाराच्या त्रासामुळे एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र त्यांचा मृत्यू झाला.