तरच महिलांवरील अत्याचार कमी होईल – डॉ.सविता बेदरकर

ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्काराचे वितरण

0
284

गोंदिया,दि.16 :- दिवसेंदिवस महिलांवर होणाऱ्या अत्याचार हे समाजातील विकृत मानसिकतेमुळे वाढत आहे.याकरिता विविध जनजागृतीपर उपक्रम घेतले जात आहेत पण हे सर्व थांबवायचे असेल तर प्रत्येक महिलांनी राजमाता जिजाऊ यांचा आदर्श घ्यावे. परक्या स्त्रीलापण आदराने बघण्याची जी शिकवण जिजाऊंने शिवाजी महाराजांना दिली त्याचप्रमाणे आज प्रत्येक महिलांनी आपल्या घरातील मुलांना शिकवण दिले तरच महिलांवरील अत्याचार कमी होईल असे डॉ.सविता बेदरकर यांनी ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार वितरणप्रसंगी आपले मत व्यक्त केले.
आकृती थिंक टुडे बहुद्देशीय संस्था व युथ स्पोर्ट क्रीडा मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून जागर नारी शक्तीचा ज्ञानज्योती सावित्रीबाई फुले सन्मान पुरस्कार वितरण असाटी कोचिंग क्लासेस  कुडवा येथे पार पडला.यावेळी घरकाम करून आपल्या संपूर्ण परिवाराची जबाबदारी सांभाळणाऱ्या  कांचन फर्दे,आसीमा विश्वास,निर्मलाबाई यादव या कर्तृत्ववान महिलांचा सत्कार  ज्येष्ठ समाजसेविका डॉ.सविता बेदरकर,गोंदिया पब्लिक स्कूल कुडवा शाखेच्या प्राचार्य वर्षा भांडारकर, माजी प्राचार्य  मानवती बैस,समाजसेविका दीप्ती तुरकर यांच्या हस्ते सत्कार करण्यात आले .
कार्यक्रमाचे संचालन संध्या डोंगरवार तर आभार समीक्षा पटले यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्राची गुडधे,माया सोनेकर,मोना दियेवार,भूमिका टिकरिया,शिवांगी टेहरा,अनिता डोंगरवार,आरती पटले,रानी डोंगरवार यांनी अथक प्रयत्न केले