अखेर केंद्रसरकारचा आरएसएस चेहरा उघड,भागवतांना झेडप्लस सुरक्षा

0
10

मुंबई दि.७ – केंद्रातील भाजपचे सरकार हे आरएसएसचे रिमोट कंट्रोल असलेले सरकार असल्याचे आधीपासूनच चर्चेत होते.आता झेडप्लस सुरक्षा देतांना संघावर जो प्रेम सरकारने दाखविला त्यावरुन सरकारचा चेहरा सुध्दा उघड झाला आहे. मोदी सरकार 10 जूनपासून आरएसएस प्रमुख मोहन भागवत यांना Z-plus सुरक्षा प्रदान करणार आहे. भागवत यांना ज्या प्रकारची सुरक्षा मिळणार आहे, तशाच प्रकारची सुरक्षा सध्या पंतप्रधान आणि राष्ट्रपतींना दिली जाते. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार भागवत हे काही दहशतवादी संघटनांच्या हिटलिस्टवर आहेत. त्यामुळेच त्यांना ही सुरक्षा प्रदान करण्यात आल्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भागवत यांच्यासाठी एक बुलेटप्रूफ बीएमडबल्यू कार असेल. तसेच त्यांच्या ताफ्यात चार इतर एसयूव्हीचाही समावेश असेल. भागवत ज्या ठिकाणी जातील त्याठिकाणी दोन दिवसांपूर्वीच एक पथक पाहणी करून सुरक्षेची खबरदारी घेइल. भागवत यांना सीआयएसएफचे 190 कमांडो सुरक्षा पुरवतील.
190 जणांचे पथक
अशा प्रकारची सुरक्षा दिली जाणारे भागवत हे देशातील पहिलेच बिगरराजकीय व्यक्ती आहेत. त्यात भागवत कोणत्याही संविधानात्मक पदावर नसल्याने ही बाब आणखीच खास ठरते. गृह मंत्रालयाने Z-plus सेक्युरिटीसाठी सीआयएसएफला आदेश दिले आहेत. ते 10 जूनपासून जबाबदारी सांभाळणार आहेत.