सरसंघचालकांवर आक्षेप घेणाऱ्या नेत्याचा राजीनामा

0
8

पीटीआय
नवी दिल्ली,दि.११:,- राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (आरएसएस) सरसंघचालक मोहन भागवत यांना पुरविण्यात आलेल्या झेड-प्लस सुरक्षेबद्दल सोशल नेटवर्कवरून थेट आक्षेप नोंदविणारे भारतीय जनता पक्षाचे राजस्थानातील नेते कैलाश नाथ भट यांनी बुधवारी पक्षाच्या पदाचा राजीनामा दिला.‘माझ्या वक्तव्यांमुळे अनेकजण दुखावले गेले, त्यामुळे मी (बुधवारी) संघटनेच्या हितासाठी राजीनामा राजीनामा देण्याचा निर्णय घेतला,‘ असे भाजपचे प्रवक्ते असलेले कैलाश नाथ भट यांनी सांगितले.पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक पारनामी यांना उद्देशून भट यांनी लिहिलेला राजीनामा स्वतःच्या फेसबुक अकाउंटवर पोस्ट केला आहे.ही झेड-प्लस सुरक्षा सामान्य स्वयंसेवकांना तुमच्यापर्यंत (भागवत) पोचण्यापासून रोखेल, आणि हा काही स्टेटस सिम्बॉल मानला जाणार नाही हे आपण लक्षात घ्यावे, असे भट यांनी भागवत यांना उद्देशून म्हटले आहे.