गडचिरोली,दि.20ःगडचिरोली जिल्ह्यातून छत्तीसगड राज्यात जाणार्या राष्ट्रीय महामार्गावरील गजामेंढी गावाजवळील त्रिशुल पाॅंईटवर मध्यरात्रीच्या सुमारास रेती वाहतूक करणा-या चार ट्रकला माओवाद्यानी आग लावून पेटवून दिल्याची घटना(दि.20)उघडकीस आली आहे.या घटनेत सुमारे 90 लाखाच्यावर नुकसान झाल्याचा अंदाज आहे.जळालेल्या वाहनात तीन हायवा ट्रकसह एका ट्रकचा समावेश असल्याचे प्राथमिक वृत्त आहे.
जहाल मृतक माओवादी सृजनाक्काच्या हत्येच्या निषेधार्थ आज(दि.20ः माओवाद्यानी बंदच आवाहन केले होते.
अलीकडेच माओवाद्याची नेता सृजनाक्का एका चकमकी दरम्यान पोलिसांकडून मारल्या गेली होती.या घटनेच्या निषेधार्थ 20 मे रोजी गडचिरोली जिल्हा बंदची घोषणा एक आठड्यापूर्वी केली होती.त्यापुर्वीच रविवारला माओवाद्यांनी बदला घेण्यासाठी हमला केल्याने झालेल्या चकमकीत दोन पोलीसही शहिद झाले होते. या बंदच्या पार्श्वभूमीवर सावरगाव पोलीस मदत केंद्राअंतर्गत राष्ट्रीय महामार्गावर गजामेंढीच्या जवळ त्रिशूल पाइंटवर मध्यराञीला छत्तीसगढ़ राज्यातून रेती वाहतूक करणा-या चार ट्रकला आग लावून पेटवून दिल्याची माहिती मिळताच पोलिसांनी तपास कार्याला सुरवात केली आहे.
चारही वाहनावर श्री साई ट्रांसपोर्टचे गडचिरोली असे लिहीले आहे. नक्षल्यांनी ट्कच्या चालक व सहका-यांना ऊतरवून तिथून निघून जाण्याची सूचना केली. त्यानंतर चारही वाहनांना आग लावली. रात्री अचानक मोठा धूर व ट्रकचे टायर फुटल्याचा जोरदार आवाज झाल्याने परिसरातील नागरीकांना घटनेचा अंदाज आला. रस्त्यावर निषेधाचे नारे लिहील्या गेले. झाड कापून त्यावर लाल नक्षली संदेश असलेले बैनर लावले असुन त्यावर 2 मे च्या सिनभट्टी चकमकीचा निषेध करीत सृजनाक्काच्या मृत्यूच्या प्रित्यर्थ श्रद्धांजलि अर्पण केली आहे. सुरूवातीला 20 मे या एकाच दिवशी पाळण्यात येणारा बंद पूढे वाढवित 22 मे पर्यंत घोषित केला आहे. या बंदच्या पार्श्वभूमिवर जिल्ह्यात नक्षली दहशत पुन्हा वाढविण्याचा प्रयत्न त्यांनी केला असल्याचे स्पष्ट होते.




