25.4 C
Gondiā
Tuesday, July 21, 2026
Home Top News आंध्रप्रदेशात चेंगराचेंगरीत २७ भाविक ठार

आंध्रप्रदेशात चेंगराचेंगरीत २७ भाविक ठार

0
27

राजमुंद्री दि.१४- आंधप्रदेशातील गोदावरीच्या तीरावरील पुष्कर घाटावर आजपासून पुष्करम सोहळ्याला सुरुवात झाली आहे. मात्र उत्सवादरम्यान झालेल्या चेंगराचेंगरीत २७ भाविक ठार झाल्याने पहिल्याच दिवशी या उत्सवाला गालबोट लागले आहे.
या उत्सवासाठी आंधप्रदेश आणि तेलंगणामधून मोठ्या प्रमाणात भाविकांची गर्दी होते. यावेळी कुलासेखर येथे पवित्र स्नानादरम्यान नागरिकांमध्ये झालेल्या चेंगराचेंगरीत २७ भाविक ठार झाले आहेत तर २० जण जखमी झाले आहेत.
चेंगराचेंगरीत जखमी झालेल्या नागरिकांना जवळच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल कऱण्यात आले आहे. मृतांमध्ये १३ महिलांचा समावेश आहे .मृतांची ओळख अद्याप पटलेली नाही.
दरम्यान, पुष्करम उत्सवादरम्यान झालेल्या या दुर्घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शोक व्यक्त केला आहे.

blank