अच्छे दिन येण्यासाठी २५ वर्ष लागतील – अमित शहा

0
10

भोपाळ,दि. १४ – निवडणूक प्रचारादरम्यान दाखवण्यात आलेले ‘अच्छे दिनां’चे प्रत्यक्षात साकार होण्यासाठी ५ नव्हे २५ वर्ष लागतील असे विधान भाजपाध्यक्ष अमित शहांनी केले आहे. ‘देशात ख-या अर्थानं अच्छे दिन येण्यासाठी ५ वर्ष पुरेशी नाहीत, त्यासाठी २५ वर्ष लागतील’ असे अमित शहांनी म्हटले आहे. भोपाळमधील एका कार्यक्रमादरम्यान ते बोलत होते. लोकसभा निवडणुकीदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जनतेला ‘अच्छे दिन आनेवाले है’ असे आश्वासन दिले होते. परिस्थिती बदल होण्याच्या अपेक्षेने जनतेने भाजपाला भरभरून मतदान करत सत्ता मिळवून दिली. मात्र शहा यांच्या विधानामुळे मतदारांचा अपेक्षाभंग होऊन भाजपाला जनतेचा रोष पत्करावा लागण्याची शक्यता आहे.

‘ ब्रिटीशांचे राज्य येण्याआधी जागतिक स्तरावर भारताचे जे स्थान होतं ते परत मिळवून देणं हे आमचे उद्दिष्ट आहे. येत्या पाच वर्षांत भाजपा सरकार महागाई, परराष्ट्र धोरण, आर्थिक विकास, सुरक्षा, रोजगारनिर्मिती, गरिबी यांच्या धोरणांच योग्य बदल घडवेल. पण जर भारताला जगात सर्वश्रेष्ठ बनवायचे असेल तर त्यासाठी २५ वर्षांचा कालावधी लागेल. तेव्हाच देश अव्वल पद गाठू शकेल’, असे ते म्हणाले.