भाजपा ओबीसी मोर्चा प्रदेश उपाध्यक्षपदी महेंद्र निंबार्ते यांची नियुक्ती

0
5
वाढदिवसाच्या शुभेच्छा

भंडारा,दिनांक १४ -भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चाच्या प्रदेश उपाध्यक्षपदी महेंद्र निंबार्ते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबई येथे झालेल्या ओबीसी मोर्चाच्या बैठकीत हे नियुक्तीपत्र ओबीसी मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष संजय गाते यांनी महेंद्र निंबार्ते यांना दिले.
अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते म्हणून महेंद्र निंबार्ते यांनी काम केले. २००५ ते २०१६ या कालावधीत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाचे सिनेट सदस्य तसेच व्यवस्थापन परिषद सदस्य म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली. या काळात विद्यार्थ्यांचे अनेक प्रश्न त्यांनी मार्गी लावले. राजकीय जीवनाची सुरुवात भंडारा नगरपरिषदेचे नगरसेवक म्हणून झाली. भारतीय जनता युवा मोर्चाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा सचिव, जिल्हा उपाध्यक्ष, भाजपा ओबीसी मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अशा अनेक जबाबदाऱ्या त्यांनी पार पाडल्या.
दरम्यान मुंबई येथे झालेल्या भाजपा ओबीसी मोर्चाच्या बैठकीत त्यांच्यावर ओबीसी मोर्चा प्रदेशाचे उपाध्यक्ष म्हणून जबाबदारी सोपविण्यात आली आहे. हे नियुक्तीपत्र प्रदेशाचे अध्यक्ष संजय गाते  यांनी त्यांना दिले. पक्षाने टाकलेला विश्वास सार्थकी ठरविण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करू असे महेंद्र निंबाते यांनी सांगितले.