शेतकऱ्यांना मदत व मनरेगामधील भष्टाचाराची चौकसी करा

0
9

शेतकऱ्यांना ऐकरी ५० हजारांची मदत जाहीर करा.

 मनरेगा अंतर्गत रस्ते व नाडेप चे खडे बांधकामात झालेल्या भष्टाचाराची चौकसी करा.

 आमदार सहसराम कोरोटे यांनी विधानसभेत मागणी

देवरी,दि.१४: गोंदिया जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसाने धान पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.  या धान उत्पादक शेतकऱ्यांना आर्थिक नुकसानीपासून सावरण्यासाठी शासनाने एकरी ५० हजार रुपयांपर्यंत मदत जाहीर करावी. तसेच मनरेगा आणि नाफेड अंतर्गत करण्यात आलेल्या कामांमध्ये झालेल्या गैरप्रकाराच्या चौकशीची मागणी आमदार सहसराम कोरोटे यांनी  मंगळवारी (दि.१२) रोजी विधानसभेत केली.

आमदार सहसराम कोरोटे विधानसभेत बोलताना म्हणाले की, धानाची कापणी व मळणी सुरू असतानाच अवकाळी पावसाने मोठ्या प्रणावर शेतकऱ्यांच्या पिकांचे नुकसान केले. शेतामध्ये साचलेल्या  पाण्यात धानाच्या कडप सापडले. आठ दिवस झालेल्या पावसामुळे शेतकऱ्यांनी कापणी केलेल्या धानाची उचल करता आली नाही. धानाच्या गंजींचे नुकसान झाले. मोठ्या प्रमाणावर धानाची नासाडी झाली. याशिवाय गंजीतील धान अंकुरले. परिणामी, जनावरांच्या चाऱ्याचा गंभीर समस्या निर्माण झाली आहे.

संकटात सापडलेल्या शेतकऱ्यांच्या पिकांचे शासनाने योग्य पंचनामे करून धान उत्पादक शेतकऱ्यांना एकरी ५० हजार रुपये आर्थिक मदत जाहीर करावी अशी मागणी आमदार कोरोटे यांनी विधानसभेत केली.

पुढे बोलताना आमदार कोरोटे यांनी मतदारसंघात मनरेगा आणि नाफेड अंतर्गत करण्यात आलेल्या गैरप्रकाराचा पाढा व वाचला. कंत्राटदारांनी या कामात मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार केल्याचा आरोप करीत अशा कंत्राटदार आणि संबंधित यंत्रणेची चौकशी करण्याची मागणी लावून धरली.