राज्य सरकारी कर्मचारी महासंघ शिष्टमंडळाने केले नवनियुक्त सीईओंचे स्वागत

0
298

गोंदिया,दि.30ः-जिल्हा परिषद राज्य सरकारी कर्मचारी महासंघाच्यावतीने २९ सप्टेंबर रोजी केंद्र व राज्य शासनाचे लक्ष वेध कार्यक्रमानंतर गोंदिया जिल्हा परिषदेचे नवनियुक्त मुख्य कार्यकारी अधिकारी प्रदिपकुमार डांगे यांची भेट घेत पुष्पगु्च्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यात आले.यावेळी महासंघाच्या शिष्टमंडळाने मुख्य कार्यकारी अधिकारी डांगे यांच्याशी चर्चा करीत संक्षिप्त मध्ये मागण्यांसदंर्भात माहिती देत पदोन्नती,तक्रार निवारण व विभाग बदल्यांसोबतच बदली झालेल्यांना कार्यमुक्त करण्यासंबधीची माहिती दिली.यावर मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी 15 दिवसात सर्व परिस्थिती समजून घेत तक्रार निवारण समितीच्या नियमित सभेसह युनियनला वेळ देऊन प्रश्न मार्गी लावण्याचे आश्वासन दिले. यावेळी मुख्य लेखा व वित्त अधिकारी अमृता परदेशी या सुध्दा उपस्थित होत्या. सदर स्वागत प्रसंगी जिल्हा परिषद कर्मचारी महासंघाचे सरचिटणीस शैलेश बैस, ग्रामसेवक युनियन जिल्हा अध्यक्ष कमलेश बिसेन,सचिव दयानंद फटिंग,कोषाध्यक्ष लक्ष्मण ठाकरे,यद्यनेश मानापूरे,लिपिक वर्गीय युनियन पदाधिकारी सुभाष खत्री,संतोष तोमर, चतुर्थ श्रेणी पदाधिकारी श्री नेवारे, श्री कुंभलकर,जे.एच.भोयरसह महिला पदाधिकारी उपस्थित होते.