महाडिबीटी संदर्भात विद्यार्थ्यांचे आधार संलग्न बँक खातेबाबत सूचना

0
298

गडचिरोली,दि.30*: अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांनी नवीन अर्ज भरतांना आधार नोंदणीकृत अर्ज भरणे आवश्यक आहे. सन 2018-19 व 2019-20 मध्ये ज्या अनु.जाती प्रवर्गातील नॉन आधार अर्ज भरले आहेत अशा विद्यार्थ्यांनी त्यांचे प्रोफाईलमध्ये जावून आधार क्रमांक तसेच आधार संगणीकृत बँक खात्याची माहिती अद्यावत करुन घेणे आवश्यक आहे. अनु.जाती प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे आधार क्रमांक बॅक खात्याशी संलग्न आहे की नाही याची पडताळणी / खातरजमा आधार पोर्टल “https://resident.uidai.gov.in/bank-mapper” या लिंक वरती जावून करावी. तसेच आधार ॲक्टीव आहे किंवा कसे याबाबत देखील सदर पोर्टल वरुन खातरजमा करावी. विद्यार्थ्यांनी महाडिबीटी पोर्टल वरील प्रणालीद्वारे निर्गमित झालेले पेमेंट व्हाउचर विद्यार्थी लॉगीन मध्ये जावून वरील रिडीम करावे. यासाठी विद्यार्थ्यांनी आपला युझर आय.डी व पासवर्ड जतन करुन ठेवणे आवश्यक आहे. महाडिबीटी प्रणालीमध्ये नोंदणीकृत होत असतांना जे लॉगीन आय.डी विद्यार्थ्यांनी तयार केलेला आहे तोच लॉगीन आय.डी विद्यार्थ्यांनी कायम स्वरुपी लक्षात ठेवून वापरावा. जेणेकरुन भविष्यात याबाबत कोणताही लॉगीन आय.डी दुबार तयार होणार नाही तसेच आपला लॉगीन आय.डी व पासवर्डची माहिती गोपनीय ठेवल्यास याचा दुरउपयोग होणार नाही. याप्रमाणे सर्व महाविद्यालयाचे प्राचार्य तसेच विद्यार्थी व पालकवर्ग यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन सहाय्यक आयुक्त समाज कल्याण, गडचिरोली यांनी केले आहे.