मराठी पत्रकार संघातर्फे वाचनालयाना स्पर्धा परिक्षाच्यां पुस्तकांचे संच भेट

0
221

देवरी,दि.03ः-समाज सुधारकांच्या क्रांतिकारी विचारांनी प्रेरित होवून युवा मराठी पत्रकार संघ तालुका देवरीच्या वतीने पिडंकेपार व चिचेवाडा या वाचनालयाला विविध स्पर्धा परीक्षांच्या पुस्तकाचे संच उवपिभागीय पोलिस अधिकारी प्रशांत ढोले यांच्या हस्ते भेट देण्यात आले. उल्लेखनिय बाब म्हणजे सामाजिक बांधिलकी जपण्याचा आगळा-वेगळा उपक्रमच युवा मराठी पत्रकार संघटने तर्फे दि.२ ऑक्टोबंर चे औचित्य साधवुन राबविले गेले.
चिचेवाडा व पिंडकेपार येथ वाचनालयाना स्पर्धा परिक्षांचे पुस्तके भेट देतेप्रसंगी उपविभीय पोलीस अधिकारी प्रशांत ढोले,सामाजीक कार्यकर्ता नितेश वालोदे, मधु दिहारी,युवा मराठी पत्रकार संघटनेचे तालुका अध्यक्ष मुकेश खरोले, सचिव डॉ.सुजित टेटे, उपाध्यक्ष अरशद शेख, भुपेन्द्र मस्के, सुभास सोनवाने, योगेश साखरे , सुदर्शन लांडेकर, विलास चाकाटे, राजेश बिंझलेकर,कैलास कोडापे उपस्थित होते.