3 वर्षीय बालकाच्या उपचारासाठी सरसावले शेकडों हात..!

- देवदूत बनून धावून आली टिम दिव्या फाऊंडेशन ....

0
315

गोंदिया,दि.03:वडिल कंत्राटी एम्बुलेंस चालक..घरची परिस्थिती बेताचीच..वरुन कोरोनाचे संकट..अशातच तीन वर्षिय बाळाला ब्रेन टिबी झाल्याचे निदान होताच आई वडिलांना मोठा धक्का बसला. कसे बसे स्वत:ला सावरत त्यानी गोंदियातील रुग्णालयातून बाळाला पुढील उपचारासाठी नागपूर येथील रुग्णालयात हलविले. नातेवाईकांच्या मदतीने त्यानी बराच खर्च केला, मात्र खर्चाची मर्यादा वाढतच गेल्याने त्यांच्यापुढे संकटाचा डोंगर उभा राहिला. उपचार तर कोणत्याही परिस्थीतीत करायचाच.. मात्र, पैसा कसा उभा करायचा? हा प्रश्न त्याना सतावू लागला. अखेर दिव्या फाऊंडेशन टिमच्या सहाय्याने त्यांचे तात्पुरते संकट टळले आणि सुरु झाला उपचार..!
3 वर्षीय बाळाच्या उपचार खर्चासाठी मदत करण्याचे आवाहन दिव्या फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अशोक काकडे, महाराष्ट्र समन्वयक चंद्रकुमार बहेकार आणि संपुर्ण टीम ने करताच मदतीचा ओघ सुरु झाला. केवळ निधीच देवून मोकळे न होता आणि कोरोना संसर्गाची पर्वा न करता बाळाच्या भेटीला थेट नागपूर येथील रुग्णालयात दिव्या टिम पोहचली आणि पालकाना आर्थिक व मानसिक बळ दिला.टिम चे दिव्य कार्य बघून पालकही भावुक झाले.
मदतीचे आवाहन करताच उपविभागीय पोलिस अधिकारी प्रिया ढाकणे, मोहीत राजनकर, प्रा. सुजित टेटे, विजय शेंडे, दिलीप कोरे, आशिष रंगारी, सिद्धार्थ डोंगरे, प्रताप मोरे, संदीप तिड़के, सुरेंद्र वाढई, विजय डोये, डा. दिनेश कटरे, सुधाकर मानवटकर, प्रिती अवसरमोन, श्री फरदे, डा. संजय देशमुख, डा. योगेश सोनारे, सुनिल फुंडे, सुनिल पटले, वंदना मेश्राम, निखिल बोहरे, अमोल बहेकार, सचिन मुनेश्वर, संजय थेर, आमगांव फॉर्मसी कॉलेज स्टॉफ, उमेंद्र बिसेन, अशोक कुमावत, दिनेश तिरेले, संजय मेश्राम, मंगेश हत्तीमारे सहित अनेक सेवाभावी देवदुतानी सढळ हाताने भरभरुन मदत केली. सध्या बालावर उपचार सुरु असून तो लवकर सुदृढ व्हावा ही आशा बाळगली जात आहे. या कार्यासाठी नरेंद्र कावळे, मुकेश खरोले, पवन पाथोडे, राकेश रोकडे, संध्या फुंड़े, निलेश बोहरे, सचिन फुंड़े आदिसह दिव्या फाऊंडेशन टिम ने परिश्रम घेतले.