उपमुकाअ राठोड यांनी सटवा येथे केला माझे ‘कुटुंब माझी जबाबदारी’ मोहिमेचा शुभारंभ

* 10 कुटुंबाला भेटी देऊन कोविड-१९ संदर्भात केले मार्गदर्शन

0
199

गोरेगाव,दि.03- शासनाच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या माझे कुटुंब माझी जबाबदारी मोहिमेचा आज गोंदिया जिल्ह्य़ात शुभारंभ झाला असून त्या अंतर्गत जिल्हा परिषद गोंदियाचे उप मुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेश राठोड यांनी गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे भेट देऊन या मोहिमेचा शुभारंभ करून 10 कुटुंबांना भेटी देऊन मार्गदर्शन केले.
जिल्ह्यात एकाच दिवशी किमान 10 लाख नागरिकांपर्यंत कोविड-१९ संदर्भात माहिती व जनजागृती व्हावी या उद्देशाने माझे कुटुंब माझी जबाबदारी ही मोहीम राबविण्यात आली. या अंतर्गत गोरेगाव तालुक्यातील सटवा येथे मोहिमेचा शुभारंभ जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता राजेश राठोड यांच्या उपस्थितीत शुभारंभ करण्यात आला. यावेळी सरपंच विनोद पारधी, जिल्हा पाणी व स्वच्छता विभागाचे शालेय स्वच्छता सल्लागार भागचंद रहांगडाले, तलाठी सोनवणे, पोलीस पाटील टीकाराम रहांगडाले, उपसरपंच ओमप्रकाश चौधरी, मुख्याध्यापक बीजेवार, ग्रामसेविका पाटील यांच्यासह अंगणवाडी सेविका, मदतनीस, शाळेतील शिक्षक, ग्रामपंचायत पदाधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. गावातील प्रत्येक कुटुंबाला भेटी देण्या संदर्भात नियोजन करून गृहभेट देण्यात आली. गावातील 264 कुटुंबांना भेटी देण्यासाठी 26 अधिकारी, कर्मचारी व पदाधिकारी यांच्या मार्फत भेटी देऊन मार्गदर्शन व जनजागृती करण्यात आली.