रेल्वेस्थानकावर घोषणा मराठी मध्ये द्या अन्यथा आंदोलन-मनसे

0
8

गोंदिया,दि. २५ -दक्षिण मध्य पूर्व रेल्वेच्या गोंदिया स्थानकावर रेल्वेगांड्याच्या माहितीसह इतर घोषणा मराठी भाषेत करण्यात यावे या मुद्याला घेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेना गोंदियाच्या वतीने गोंदिया रेल्वे स्थानक प्रबंधकांना निवेदन सादर करण्यात आले. मनसे जिल्हाध्यक्ष मनीष चौरागडे यांच्या मार्गदर्शनात गोंदिया शहर मनसेच्या पदाधिकाèयांनी हे निवेदन दिले.
यावेळी गोंदिया महाराष्ट्रात असून रेल्वे स्थानकावर होणारी घोषणा मराठीमध्ये का नाही असा प्रश्न विचारण्यात आला. रेल्वे मंडळाचे प्रादेशिक भाषेच्या वापरा बद्दल दिशानिर्देश असतांना फक्त हिंदी आणि इंग्रजी मध्ये घोषणा का? मराठी ने काय घोड मारल असे संतापजनक प्रश्न उपस्थित करून रेल्वेप्रशासनाची चूक लक्षात आणून देण्यात आली.तसेच मराठी भाषेत घोषणा सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा शहर अध्यक्ष सुरेश ठाकरे यांनी दिले.
निवेदनात महाराष्ट्र एक्सप्रेस मध्ये ज्या प्रकारे नागपूर पर्यंत काही आरक्षित डब्यांमधे प्रवास करायची मुभा आहे त्याप्रकारे विदर्भ एक्सप्रेस मध्ये सुद्धा मुभा मिळावी नाही तर अतिरिक्त सामान्य डबे जोडण्यात यावे असे निवेदन रेल्वे स्थानक प्रबंधकांना देण्यात आले. त्यांनी लगेच घोषणा विभागाला मराठी मध्ये घोषणा करण्याचे आदेश देत येत्या तीन दिवसात घोषणा मराठी मध्ये सुरू होतील असे आश्वासन त्यांनी दिले.या प्रसंगी जिल्हा उपाध्यक्ष मुकेश मिश्रा, मीलन रामटेककर तालुका अध्यक्ष निखिल ढोगे उदय पोफळी उदय काळे राजेश नागोशे यासीन शेख दिलीप कोसरे आनंद राहुलकर पीयूष लांजेवार राज वेदय शुभम शेंडे देवीलाल रावते आत्माराम पटले राजकुमार भगत, विशाल राणा, लोकेश गौतम, शशांक खांडेकर अन्य पदाधिकारी उपस्थित होते.