गोंदिया पोलीस मुख्यालयात क्रीडा स्पर्धेचे उदघाटन

0
16

गोंदिया,दि. ३० : पोलीस मुख्यालय गोंदिया येथे पोलीस क्रीडा स्पर्धेचे आयोजन २८ ऑगस्ट पासून करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन प्रमुख अतिथी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी यांचे हस्ते सायंकाळी सहा वाजता करण्यात आले. या क्रीडास्पर्धेमध्ये जिल्ह्यातील सर्व उपविभागामधील पोलीस अधिकारी व कर्मचारी यांनी सहभाग घेतला होता. या क्रीडास्पर्धेच्या उद्घाटनानंतर राखीव पोलीस उपनिरीक्षक चंद्रबहादुर ठाकूर यांच्या नेतृत्वात संचालन केले. प्रमुख अतिथीच्या हस्ते क्र्रीडा स्पर्धेची ज्योत प्रज्वलित करण्यात आली. चार दिवस चालना-या क्रीडा स्पर्धेत खो-खो, कबड्डी, व्हालीबॉल, बास्केटबॉल, हॅडबॉल, कुस्ती, अथलेटीक्स, वेट लिप्टींग, ज्युडो, हॉकी, व फुटबॉल या खेळाचां समावेश करण्यात आला आहे. कार्यक्रमाचे अतिथी जिल्हाधिकारी डॉ. विजय सूर्यवंशी, यांनी कार्यक्रमाप्रसंगी खेडाळूंना मार्गदर्शन करून खेडाळूवृत्ती वृद्धीगत व्हावी याकरिता क्रीडा स्पर्धांचे आयोजन करण्यात यावे. यावेळी कार्यक्रमास पोंलिस अधीक्षक शशी कुमार मिना, अपर पोलीस अधीक्षक डॉ. संदीप पखाले, पोलीस उपअधीक्षक मुख्यालय गृह सुरेश भोयर, उपविभागीय पोलीस अधिकारी गोंदिया रामदास राठोड, उपविभागीय पोलीस अधिकारी आमगांव श्रीमती दिपाली खन्ना परिवहन उपविभागीय पोलीस अधिकारी मंदार जवळे, जिल्हा क्रीडा अधिकारी अशोक गिरी, राखीव पोलीस निरीक्षक सुनील बांम्डेकर,राखीव पोलीस उपनिरीक्षक चंद्रबहादुर ठाकूर तसेच जिल्ह्यातील इतर पोलीस अधिकारी कर्मचारी लिपिक वर्ग तसेच तसेच मान्यवरांचंी उपस्थिती मोठया संख्येने होती.कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन अपर पोलीस अधीक्षक संदीप पखाले यांनी केले.