पक्षात प्रामाणिक कार्य करा,अन्यथा पक्ष सोडा-खा.पटेलांचा गर्भित इशारा

0
18

राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोंदिया/भंडारा येथील कार्यकर्ता मेळावा

खेमेंद्र कटरे
गोंदिया दि.३०-भंडारा लोकसभा मतदारसंघातील प्रत्येक क्षेत्राच्या विकासासाठी आपण कसोशीने प्रयत्न केले.त्याचाच परिणाम की ,आज भंडारा-गोंदिया जिल्ह्यात जे काही उद्योग दिसत आहेत.ते आमच्या विकासात्मक धोरणाचेच पाऊल होते.परंतु २०१४ च्या निवडणुकीत जनतेने मोदी लाटेवर स्वार होऊन आम्हाला पराभवाचा धक्का दिला.ते पराभव आम्ही स्वीकारले.तसेच आपणही आपल्याला जिल्हा परिषद,पंचायत समिती,ग्रामपंचायत व सहकार क्षेत्रातील निवडणुकीत मिळालेल्या पराभवाला पचवून पुन्हा यशासाठी कार्यरत राहा असे आवाहन राष्ट्रवादीचे केंद्रीय वरिष्ठ नेते व राज्यसभा खासदार प्रफुल पटेल यांनी केले.
सोबतच पटेल यांनी आजपर्यंतच्या निवडणुकीतील चुका सुधारत पक्षासाठी प्रामाणिकपणे कार्य करा,ते जमत नसेल तर गुपचूप पक्ष सोडून
मोकळी व्हा असा सज्जड दम या कार्यक्रमाच्या माध्यमातून पदाधिकारी व कार्यकत्र्यांना भरला.राष्ट्रवादी पक्षाची वाढ कशी झाली पाहिजे याकडे लक्ष द्या.दुतोंडी राजकारण बंद करून पक्षाचे नुकसान टाळा असे म्हणत हे कृत्य जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत टाळले असते तर आज २६ जिल्हा परिषद सदस्य हे एकट्या राष्ट्रवादीचे राहिले असते असेही म्हणाले.गेल्या २५ वर्षापासून ससंदेचा मी सदस्य असल्याने व पक्षाच्या जिल्ह्यातील प्रमुख असल्याने मला कोण काय करतो कुणाच्या विरोधात काम करतो,कोण चागंला काम करतो हे कळत नसेल हे विसरून जा असे सांगत यापुढे पक्षाच्या विरोधात काम करणाèयाची गय केली जाणार नाही असेही खा.पटेल आज(दि.३०) गोंदिया व भंडारा येथील राष्ट्रवादी काँग्रेसच्या पदाधिकारी व नवनिर्वाचित पदाधिकारी व कार्यकर्ता मेळाव्यात म्हणाले.
पुढे म्हणाले की,आत्तापर्यंत जिल्ह्याचा जो काही विकास झाला, यात सर्वांत मोठी भूमिका ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची आहे. यात मात्र काहींनी पोळी शेकण्याचे कार्य केले आहे. देशात व राज्यात काँग्रेस भाजपचा विरोध करीत असून जिल्ह्यात मात्र युती होत आहे. या युतीला कुणी काहीही नाव ठेवत असले तरी सत्तेसाठी विरोधी पक्षांसोबत एकत्र येऊन करणारे राजकारण हे गोंदियातील जनतेला नक्कीच माहीत झालेले आहेत.
जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाने भाजपाच्या विरोधात वातावरण निर्माण केले होते. याचा लाभ मात्र काँग्रेसने घेतला. २०१० च्या निवडणुकीत आम्ही १७ जागांची मागणी केली असता त्या दिल्या नाही. त्यावेळी सुध्दा आम्ही स्वतंत्र लढलो. आणि १४ जागा निवडून आणल्या. यावेळी प्रचाराला कमी वेळ मिळाला त्यातच आपल्याकडे गोंदिया व भंडारा या दोन्ही जिल्ह्याची जबाबदारी असल्याने वेळ पुरेसा मिळाला नाही. अन्यथा यापेक्षा अधिक जागांवर आमचे उमेदवार निवडून आले असते. यश अपयश हे लागले असून कार्यकत्र्यांनी खचून न जाता आपण कुठे कमी पडलो याचा विचार करून नव्या जोमाने पक्षाच्या कामाला लागावे असेही म्हणाले.
काँग्रेस व भाजपच्या युती बद्दल बोलताना म्हणाले की जीपच्या निवडणुकात आम्ही सुध्दा भाजप सोबत युती करू शकत होतो. मात्र आम्ही ते केले नाही. कारण जनतेनी आम्हाला भाजपच्या विरोधात मते दिली होते. व आम्ही जनतेच्या विश्वासाला तडा जाऊ देणार नाही. मात्र काँग्रेसने तसे केले असून याचे परिणाम येत्या नगर पंचायतीच्या निवडणुकीत या पक्षाला भोगावे लागणार असून राष्ट्रवादीला याचा निश्चितच लाभ होईल असेही खा.पटेल म्हणाले.

अदानी समूह तोट्यात
गोंदिया जिल्ह्यातील तिरोडा येथे असलेला अदानीचा उद्योग आणण्यात आमचाही वाटा आहे.आजच्या घडीला मोदीचे सरकार हे अदानी अंबानीचे असले तरी अदानीचा तिरोडा येथील उद्योग २५०० कोटीच्या तोट्यात सुरू आहे.ज्याप्रमाणे आमचा शेतकèयाच्या धानाला भाव मिळत नाही,तशीच अवस्था उद्योगाची झाली आहे.१६ महिने लोटले परंतु आमच्या शेतकèयांना धानाचा बोनस मिळाला नाही,की भाववाढ मिळाली नाही.आमच्या काळात २८०० रुपये प्रतिqक्वटलपर्यंत धानाला भाव मिळायचा आता मात्र १७०० च्या आत शेतकèयाला आपले धान विकावे लागत आहे,हेच का अच्छे दिन असाही प्रश्न खा.पटेल यांनी उपस्थित केला.

भंडारा लोकसभा मतदारसंघात भाजपसोबतच काँग्रेसही आपला विरोधी पक्ष
शेतकèयांच्याच नव्हे तर इतर समस्यांना घेऊन सुध्दा जेव्हा केव्हा आपणास मोर्चा काढावे लागेल त्यावेळी एकाच ठिकाणी नव्हे तर दोन ठिकाणी आपल्या मोच्र्याचा थांबा जिल्ह्यात द्यावा लागणार आहे.कारण जिल्ह्यामध्ये कांँग्रेस व भाजप हे दोन्ही एकमेकासोबत सत्तेत आहेत.
या मेळाव्याला आमदार राजेंद्र जैन,माजी आमदार दिलीप बनसोड,माजी म्हाडा सभापती नरेश माहेश्वरी,माजी जिल्हा परिषद अध्यक्ष विजय शिवणकर,महिला काँग्रेस अध्यक्ष राजलक्ष्मी तुरकर,महिला बँकेच्या संचालिका प्रिया हरिणखेडे,ओबीसी आघाडीचे अध्यक्ष बबलू कटरे,माजी.जि.प.उपाध्यक्ष छाया चव्हाण,जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर,मनोज डोंगरे,सुखराम फुंडे,जियालाल पंधरे,सुरेश हर्षे,राजेश भक्तवर्ती,पंचायत समिती सदस्य केवल बघेले,उपासभापती डॉ.किशोर पारधी,जि.प.सदस्य खुशबू टेंभरे,विणा बिसेन,ललिता चौरागडे,मनोहर चंद्रिकापुरे,टिकाराम मेंढे,आमगाव तालुका महिला अध्यक्ष कविता रहागंडाले,पंचम बिसेन,तिरोड्याचे नगराध्यक्ष अजय गौर,यशवंत परशुरामकर,गोंदिया तालुका अध्यक्ष कुंदन कटारे,हिरालाल चव्हाण,अविनाश काशिवार,डॉ.वाढई,गजानन परशुरामकर यांच्यासह इतर मान्यवर उपस्थित होते.यावेळी बबलू कटरे,नरेश माहेश्वरी,विजय शिवणकर,आमदार राजेंद्र जैन,राजल्क्षमी तुरकर आंदीनीही आपले विचार व्यक्त केले.संचालन जि.प.सदस्य गंगाधर परशुरामकर यांनी तर आभार शहर अध्यक्ष शिव शर्मा यांनी मानले.