राज्य कर्मचार्‍यांच्या उद्याच्या लाक्षणिक संपाला संघटनांचा पाठिंबा

0
12

गोंदिया दि.१- विविध मागण्यांना घेऊन राज्य सरकारी कर्मचारी मध्यवर्ती संघटनेने २ सप्टेंबर रोजी देशव्यापी लाक्षणिक संप पुकारला आहे. या संपाला कर्मचार्‍यांनी मोठय़ा संख्येत उपस्थित राहण्याचे आवाहन निमंत्रक लिलाधर पाथोडे, पी.जी. शहारे, नरेंद्र रामटेककर, नेवारे, गजभिये, राणे, आर.आर.मिश्रा, लिलाधर तिबुडे, के.व्ही.नागफासे, संजय धार्मिक, रविंद्र नागपुरे, विठ्ठल भरणे, डॉ. एल.यु.यादव यांनी केले आहे.
नविन अंशदायी पेंशन योजना रद्द करून निश्‍चित लाभाची वैधानिक पेंशन योजना पुनर्र स्थापित करणे,कंत्राटी व नैमित्त कर्मचार्‍यांना सेवेत कायम करणे, सर्व संवर्गातील रिक्त पदे तत्काळ भरावी, सातव्या वेतन आयोगाची शिफारशी राज्य सरकारी कर्मचार्‍यांना त्याच तारखेपासून लागू करावे, श्रम व औद्योगिक कायद्याची अंमलबजावणी करावी अशा विविध मागण्यांचा समावेश आहे.

महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समितीचा पाठिंबा
केंद्र व राज्य शासनाने शेतकरी तसेच सरकारी कर्मचारी, कामगार विरोधी धोरण स्विकारले असून या विरोधात राज्य सरकारी, जि.प. कर्मचारी, केंद्रीय कर्मचारी बुधवार २सप्टेंबर रोजी देशव्यापी संपावर जात आहे. या संपामध्ये शिक्षक/शिक्षकेतर कर्मचार्‍यांनी मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे असे आव्हान महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक समिती जिल्हा शाखा गोंदियाच्या वतीने जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत व जिल्हा सरचिटणीस एल.यू. खोब्रागडे यांनी केले आहे.
केंद्र व राज्य सरकारने भूसंपादन कायद्यात सुधारण्याचा नावाखाली शेतकर्‍यांना देशोधडीला लावण्याचे प्रयत्न होत आहे. सार्वजनिक उपक्रमाचे खाजगीकरण करण्यात येत असल्याने शाश्‍वत हमीची पेंशन गुंडाळत आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळा, महाविद्यालये व विद्यापीठ बंद करुन खाजगीकरण केल्या जात आहे. नोव्हेंबर २00५ नंतर लागलेल्या कर्मचार्‍यांचा पेंशन बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.जानेवारी २0१५ पासून महागाई भत्याबाबद उदासीन धोरण स्विकारल्याचा आक्षेप समितीने नोंदविला आहे. सदर संपाला शिक्षकांनी पाठिंबा देण्याचे आवाहन जिल्हाध्यक्ष मनोज दिक्षीत, एल.यू. खोब्रागडे, शेषराव येडेकर, एस.सी.पारधी, किशोर डोंगरवार, डी.बी.रहांगडाले, संदिप तिडके, एन.बी.बिसेन, रमेश भलावी, सतीश दमाहे, टी.आर.लिल्हारे, बी.आर. दिप, सुरेश रहांगडाले, पी.आर.पारधी, जी.एन. पाटणकर, आर.जी.मेश्राम, नानिकराम चिर्वतकर, के.के.नेवारे, सिध्दार्थ खोब्रागडे, कैलाश हाडगे, प्रदीप रंगारी, वाय.बी.चौव्हाण, लोधी, पी.आर. बडोले, डी.आर.जिभकाटे, कहालकर, व्ही.जी.राठौड, जी.सी. बघेले, महिला प्रतिनिधी छाया कोसरकर, पुष्पा तुरकर, अंजीता मेंढे, रेखा बोरकर, ललिता लिल्हारे, भगवती बैस यांनी केले आहे.

चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांचा पाठिंबा
जिल्हा परिषद आयोजित लाक्षणिक संपाला जिल्हा परिषदेच्या कर्मचारी महासंघाने पाठिंबा दर्शविला असून २ सप्टेंबर रोजी एक दिवसाचा लाक्षणिक संप करण्यात येणार आहे. या संपाची बिगुल १सप्टेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर वाजणार आहे. ३व ४ सप्टेंबरला निदर्शने करून ५ सप्टेंबरला सकाळी १0 ते १२या दोन तासाच्या काळात काम बंद आंदोलन व ७ सप्टेंबर रोजी बेमुदत संप करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील राज्य सरकारी चतुर्थ श्रेणी कर्मचारी व जिल्हा परिषदेच्या चतुर्थ श्रेणी कर्मचार्‍यांनी सदर आंदोलनाला सहकार्य करण्याचे आवाहन सरचिटणीस लिलाधर तिबुडे, अध्यक्ष राजेश कुंभलवार, मोहन पुरी, नामदेव मेश्राम, टी.डी.शेंडे, कमला लिल्हारे यांनी केले आहे.