भंडारा जिल्ह्यात आज 63 रुग्णांना डिस्चार्ज;67 कोरोना पॉझिटिव्ह

0
13

 

  • बरे झालेले रुग्ण 10877
  • पॉझिटिव्ह रुग्णाची संख्या 11721
  • क्रियाशील रुग्ण 567
  • आज 00 मृत्यू
  • एकूण मृत्यू 277
  • रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.80 टक्के

भंडारा दि. 16 : जिल्ह्यात आज 63 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. बरे झालेल्या रुग्णांची संख्या 10877 झाली असून आज 67 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 11621 झाली आहे. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.80 टक्के आहे.

            आज 611 व्यक्तींच्या घशातील स्त्रावाचे नमुने तपासण्यात आले असून त्यापैकी 67 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या आहेत. आतापर्यंत 97 हजार 500 व्यकींच्या घशातील स्त्रावाची तपासणी करण्यात आली. त्यात 11721 व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळून आल्या.

            जिल्ह्यात आज कोरोना पॉझिटिव्ह आलेल्या मध्ये भंडारा तालुक्यातील 18, मोहाडी 04, तुमसर 15, पवनी 08, लाखनी 07, साकोली 13 व लाखांदुर तालुक्यातील 03 व्यक्तीचा समावेश आहे. आतापर्यंत 10877 रुग्णांनी कोरोनावर यशस्वीपणे मात केली आहे. जिल्ह्यात आता कोरोनाबधितांची संख्या 11721 झाली असून 567 क्रियाशील रुग्ण आहेत. आज कोरोनाच्या 00 रुग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात कोरोना पॉझिटिव्ह मृतांची संख्या एकूण 277 झाली आहे.

            रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 92.80 टक्के आहे. तर जिल्ह्याचा मृत्युदर 02.36 टक्के एवढा आहे. शासकीय व खाजगी रुग्णालयात बाह्य रुग्ण विभागात येणाऱ्या कोणत्याही तापाच्या रुग्णांची कोविड चाचणी प्रिस्क्राईब करावी असे निर्देश जिल्हाधिकारी संदीप कदम यांनी दिले आहेत.