दोन मृत्यूसह आज 52 नवीन कोरोना बाधित तर 56 कोरोनामुक्त*

0
27

गडचिरोली,दि.16*: आज जिल्हयात 52 नवीन बाधित आढळून आले. तसेच आज 56 जणांनी कोरोनावर मात केल्याने त्यांना रूग्णालयातून घरी सोडण्यात आले. यामुळे जिल्हयातील आत्तापर्यंत बाधित 8650 पैकी कोरोनामुक्त झालेली संख्या 8193 वर पोहचली. तसेच सद्या 363 सक्रिय कोरोना बाधितांवर उपचार सुरू आहेत. आत्तापर्यंत जिल्हयात एकुण 94 जणांचा मृत्यू कोरोनामुळे झाल्याची नोंद आहे. दोन नवीन मृत्यूमध्ये 70 वर्षीय पुरुषाचा समावेश असून दूसरी व्यक्ति वडसा येथील 77 वर्षीय पुरुष एचटीएन व मधुमेहाने ग्रस्त होते. जिल्हयातील कोरोना रूग्ण बरे होण्याचे प्रमाण 94.72 टक्के, सक्रिय रूग्णांचे प्रमाण 4.20 टक्के तर मृत्यू दर 1.09 टक्के झाला.

नवीन 52 बाधितांमध्ये गडचिरोली 22, अहेरी 1, आरमोरी 3, भामरागड 6, चामोर्शी 10, धानोरा 4, एटापल्ली 0, कोरची 0, कुरखेडा 4, मुलचेरा 0, सिरोंचा 0 व वडसा येथील 2 जणांचा समावेश आहे.

आज कोरोनामुक्त झालेल्या 56 रूग्णांमध्ये गडचिरोली 13, अहेरी 2, आरमोरी 3, भामरागड 0, चामोर्शी 0, धानोरा 37, एटापल्ली 0, मुलचेरा 0, सिरोंचा 0, कोरची 0, कुरखेडा 1 व वडसा मधील 0 जणाचा समावेश आहे.
नवीन बाधितामध्ये गडचिरोली तालुक्यातील रामपूरी वार्ड 1, सोनापूर कॉम्पलेक्स 3, साईनगर 3, स्नेहानगर 4, पारडी 1, इंदिरानगर 1, एसपी कार्यालय 1, वनश्री कॉलनी 1, रामनगर 1, चामोर्शी रोड 1, अहेरी तालुक्यातील बाधितामध्ये रेपनपल्ली 1, आरमोरी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, भामरागड तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 1, कुक्कामेठा 1, मेडपल्ली 2, हीनबट्टी 2, चामोर्शी तालुक्यातील बाधितामध्ये स्थानिक 3, आष्टी 4, क्रिष्णा नगर 1, कुनघाडा 1, जामगिरी 1, धानोरा तालुक्यातील बाधितामध्ये पेंढरी 4, एटापल्ली तालुक्यातील बाधितामध्ये 0, कोरची तालुक्यातील बाधितामध्ये 0, कुरखेडा तालुक्यातील बाधितामध्ये नान्ही 2, स्थानिक 2, मुलचेरा तालुक्यातील बाधितामध्ये 0, सिरोंचा तालुक्यातील बाधितामध्ये 0, व वडसा तालुक्यातील बाधितामध्ये गांधी वार्ड 2, तर इतर जिल्ह्यातील बाधितामध्ये 5 जणांचा समावेश आहे.
****