नव्या राज्य पुनर्रचना आयोगाची गरज

0
10

नागपूर दि. १६- विदर्भासह देशातील अनेक भागांतून स्वतंत्र राज्यांच्या मागणी होत आहे. संबंधित भागातील जनतेच्या भावना लक्षात घेऊन केंद्र सरकारने नव्या राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना करावी, अशी मागणी विदर्भ राज्य जनआंदोलन समितीने केली आहे.

विदर्भ राज्य जनआंदोलन समितीची बैठक नुकतीच पार पडली. अध्यक्षस्थानी ज्येष्ठ अर्थतज्ज्ञ श्रीनिवास खांदेवाले होते. यावेळी त्यांनी महाराष्ट्रात राहून विदर्भ अविकसित राहिल्याचे स्पष्ट केले. पश्‍चिम महाराष्ट्रातील नेते मुंबई, ठाणे, पुणे व नाशिक यापलीकडे महाराष्ट्राचे हित पाहत नाहीत. नागपूर कराराची अंमलबजावणी काटेकोरपणे झाली नाही. गेल्या 50 वर्षांत विदर्भाची प्रगती झाली नाही. याउलट मोठ्या राज्यातून वेगळे झालेल्या छत्तीसगड, उत्तराखंड या राज्यांनी प्रगती साधल्याचे स्पष्ट झाले आहे. यासाठी विदर्भ राज्याची निर्मिती झाल्याशिवाय प्रगती होणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
यावेळी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश बाळ यांनी विचार व्यक्त केले.प्रत्येक राज्यांची वेगवेगळी दखल घेण्याऐवजी देशात नव्या किती राज्यांची आवश्‍यकता आहे. यासाठी केंद्र सरकारने नव्या राज्य पुनर्रचना आयोग स्थापन करावा. नव्या राज्याच्या निर्मितीसाठी निश्‍चित निकष ठरवावेत. त्यानंतर देशात नव्या राज्यांची निर्मिती करावी, अशी सूचना त्यांनी केली. यावेळी राम नेवले, अरुण केदार उपस्थित होते.