मामा तलावाच्या दुरुस्तीसाठी आता हेक्टरी ५० हजार

0
9

अर्थमंत्री मुनगंटीवारांचा महत्त्वपूर्ण निर्णय

गोंदिया,दि. १६ -पूर्व विदर्भातील भंडारा, गोंदिया, गडचिरोली, चंद्रपूर व नागपूर जिल्ह्यात मोठ्या संख्येने असलेल्या मामा तलाव(मालगुजारी)दुरुस्तीसाठी लागणाèया निधीसंदर्भात राज्याचे अर्थमंत्री व वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांची नागपूर विभागातील जिल्हाधिकारी,मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्यासह वरिष्ठ अधिकाèयांसोबत १४ सप्टेंबरला झालेल्या बैठकीला यश मिळाले आहे.या बैठकीत आता मामा तलावाच्या दुरुस्तीसाठी जे आधी हेक्टरी २८ हजार रुपये मिळायचे त्यात २२ हजाराने वाढ करून ५० हजार रुपये हेक्टरीप्रमाणे दुरुस्तीसाठी निधी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.ना.मुनगंटीवार यांसबधीची घोषणा केली असून गेल्या अनेक वर्षापासून विदर्भातील रखडलेल्या मामा तलाव दुरुस्तीचा प्रश्न मार्गी लागण्यास मदत होणार आहे.
एकट्या गोंदिया जिल्ह्याच्या विचार केल्यास १५०० च्या वर मामा तलाव त्यातही २५६ च्या वरील मामा तलावाची दुरावस्था झाल्याने ते दुरुस्तीच्या प्रतीक्षेत होते.या निर्णयाने या मामा तलावांच्या दुरुस्ती मार्ग मोकळा होणार आहे.
शासनाच्या ग्रामविकास व जलसंधारण विभागाने ६ जानेवारी २०११ रोजी ० ते १०० हेक्टर qसचन क्षमता असलेल्या माता तलावांच्या दुरुस्तीसाठी २८ हजार रुपये प्रति हेक्टर निधीची तरतूद होती.त्यामध्ये १४ सप्टेंबरच्या बैठकीनंतर वाढ झाल्याने आता ती ५० हजार झाली आहे. जिल्ह्यात १ हजार ४२१ मामा तलाव असून या तलावांची qसचन क्षमता ही कमाल २८ हजार ७३० हेक्टर आहे. परंतु या तलावावर वाढते अतिक्रमण व दुरुस्तीअभावी आजघडीला यातून २० हजार ५५२ हेक्टरच qसचन होत आहे.
२००८ ते २०१५ या कालावधीत राष्ट्रीय कृषी विकास योजना, विदर्भ qसचन सधन कार्यक्रम व जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत जिल्ह्यातील ६२५ मामा तलावांची दुरुस्ती करण्यात आली होती. यावर २० कोटी ५८ लाख रुपये निधीचा खर्च झाला होता.जिल्ह्यातील २५६ तलाव नादुरुस्त असून शासनाच्या २०११ च्या निर्णयानुसार या तलावांच्या दुरुस्तीसाठी १४ कोटी ८१ लक्ष रुपयांच्या निधीची गरज होती,आता त्या रकमेत वाढ झाल्याने हा निधी सुध्दा वाढणार आहे.