तुमसर तालुक्यात विजपडून तिघे जखमी

0
12

गोंदिया-गोंदिया/भंडारा जिल्ह्यात आज दुपारपासून पुन्हा परतीच्या पावसाने हजेरी लावल्याने शेतकरी सुखावला गेला आहे.दुपारपासून सुरु असलेल्या पावसाने सवर्त्र हजेरी लावली सोबतच विज पडल्याने भंडारा जिल्ह्यातील तुमसर तालुक्यात तिघेजण जखमी झाल्याची घटना घडली आहे.त्या जखमीमध्ये अजय रामलाल टेकाम, सामत्री रामलाल टेटेका,भागरता सराटे,रा.पौणरखारी यांचा समावेश आहे.गोंदिया जिल्ह्यातील देवरी तालुक्यातील मासुलकसा येथे काल विज पडून एकजण जखमी झाल्याची घटना घडली.सततंधार पावसामूळे तलावबोड्यातील पाणीसाठ्यात वाढ झाली आहे.तर शेतातील धानपिकाला सुध्दा या पावसामुळे लाभ मिळणार आहे.