डॉ.अभय बंग, डॉ.राणी बंग यांना लखनौच्या संस्थेकडून डॉक्टरेट

0
15

गडचिरोली, दि.२४: ज्येष्ठ समाजिक कार्यकर्ते व संशोधक डॉ. अभय व डॉ. राणी बंग यांना लखनौ येथील संजय गांधी पदव्युत्तर वैद्यकीय संस्थेच्या वतीने डॉक्टरेट बहाल करण्यात येणार आहे. येत्या २६ सप्टेंबर रोजी संस्‍थेच्‍या २० व्या दीक्षांत समारंभात राज्यपालांच्या हस्ते त्यांना डॉक्टरेट प्रदान करण्यात येणार असल्याची घोषणा संस्थेच्या वतीने करण्यात आली.
संजय गांधी वैद्यकीय पदव्युत्तर संस्थेची स्थापना १९८७ – ८८ साली संसदेद्वारे करण्यात आली. वैद्यकीय शिक्षण देणारी अग्रगण्य संस्था म्हणून या संस्थेचे नाव घेतले जाते. एम्स, नवी दिल्ली व पदव्युत्तर वैद्यकीय संस्‍थान, चंदीगढ यांच्या समकक्ष अशा या संस्थेमध्ये संशोधन, उच्च दर्जाचे प्रशिक्षण देण्याच्या सोयी, जपान आंतरराष्ट्रीय सहकारी संस्था यांच्यां अंतर्गत प्रशिक्षण, गरजू रुग्णांना कमी दरात उपचार, जनुकीय शास्त्र, व बालरोग अशा अनेक सोयी उपलब्ध आहेत. देशात कुठेही उपलब्ध नसलेल्या सुविधा संजय गांधी वैद्यकीय संस्थेत देण्यात येतात.