ग्रामीण विकासात पंचायत समितीची महत्त्वाची भूमिका – आ. अग्रवाल

0
27

गोंदिया,दि. २५-ग्राम पंचायतीच्या मागण्या जिल्हा परिषदेपर्यंत पोहचविणे, व जिल्हा परिषदेच्या योजना ग्राम पंचायतीत आणून त्यावर अंमलबजावणी करण्याचे काम पंचायत समितीचे असून जिल्हा परिषद व पंचायतीला जोडण्याचे कार्य पंचायत समितीचे असून ग्रामीण विकासात पंचायत समितीची महत्त्वाची भूमिका असते असे प्रतिपादन गोंदिया विधानसभा क्षेत्राचे आमदार गोपालदास अग्रवाल यांनी केले. ते येथील पंचायत समितीच्या सभागृहात आयोजित समीक्षा बैठकीत बोलत होते.
येथील पंचायत समितीच्या सभागृहात नुकतीच समीक्षा बैठक आयोजित करण्यात आली होती. अध्यक्षस्थानी जिल्हा परिषद अध्यक्ष श्रीमती उषा मेंढे तर प्रमुख पाहुणे म्हणून आमदार गोपालदास अग्रवाल होते. यावेळी पं. स. सभापती स्नेहा गौतम, उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती, माजी उपसभापती चमणलाल बिसेन, जि. प. सभापती परसराम कटरे, विमल नागपुरे, रमेश अंबुले, जि. प. सदस्य सीमा मडावी, विजय लोणारे, गट विकास अधिकारी वालकर आदी उपस्थित होते. दरम्यान उपसभापती ओमप्रकाश भक्तवर्ती यांनी मागील वर्षी १३ व्या वित्त आयोगाअंतर्गत विकास निधीपेक्षा अधिकची काम झाले असून यावर्षीचा विकास निधी जुन्या कामाच्या देय करिता गटविकास अधिकारी नियमबाह्यरीत्या वापरत असल्याचे सांगितले. यावेळी गट विकास अधिकारी यांनी आराखडा सादर केला. याप्रसंगी गरजू नागरिकांना घरकुल, महिलांना लघू उद्योगाकरिता प्रशिक्षण, पेयजल पूर्ती योजना आदी विषयांवर चर्चा करण्यात आली.