चुकीचा रक्तगट चढविलेला रूग्ण मृत्युनंतर ही जीवंत ?

0
17

गोंदिया ,दि. २५-गोंदिया के.टी.एस.जिल्हा शासकीय रूग्णालयात 18 सप्टेंबर ला एका परिचारिकेने चुकीचे रक्तगट चढविल्याने दोन रूग्णांची प्रकृती अत्यंत खालावली होती. त्यातील एका रूग्ण सैयद अकरम याला नागपूरला हलविण्यात आले. तर दुसरी रूग्ण ईश्वरदास उके याला के.टी.एस.रूग्णालयाच्या अतीदक्षता विभागात वेंटीलेटर व ठेवण्यात आले. मात्र 22 सप्टेंबर रोजी ईश्वरदास उके यांचा मृत्यु झाला. मात्र या प्रकरणाची नोंद जिल्हा रूग्णालय प्रशासनाने रूग्णालयातील पोलिस चैकीकडे अद्याप नोंदविलेली नाही. यावरून पोलिसांच्या दृष्टीने मृत ईश्वरदास उके अद्याप ही जीवंत असून उपचार घेत आहे.
रूग्णालयाच्या पोलिस चैकीत ईश्वरदास उके यांचा मृत्यु होवून दोन दिवस लोटून सुद्धा स्टेशन डायरीत अद्याप ही मृत्यु ची नोंद करण्यात आलेली नाही. तसेच पोलिसांनाही ईश्वरदास उके यांच्या नातेवाईकांनी एक अर्ज दिला होता की चुकीचे रक्तगट चढविलेल्या प्रकरणाची चैकशी करण्यात यावी. मात्र मृत्युची बातमी अद्याप देण्यात आली नाही. मृत उके च्या नातेवाईकांनी पत्रपरिषद घेवून चुकीचे रक्तगट चढविणा-या रूग्णालयातील परिचारिका,रक्त तपासणी करणारे डाॅक्टर व जिल्हा शल्य चिकित्सक यांना निलंबित करण्यात यावे अन्यथा शिवसेना सोबत आंदोलन करणार असा इशारा दिला होता.
मात्र ईश्वरदास उके यांची मृत्यु होवून दोन दिवस लोटून सुद्धा कोणताही आंदोलन किंवा पोलिसांना कारवाई करीत तक्रार केलेली नाही. याप्रकरणी कारवाईच्या नावावर फक्त परिचारिका वर्षा साखरे हीला निलंबित करण्यात आले असून यात नातेवाईकांच्या म्हणयानुसार दोषी असलेले रक्ततपासणी करणारे डाॅ.बी.डी.जायसवाल, निवासी वैद्यकिय अधिकारी डाॅ.अनुप्रिया झा, व जिल्हा शल्य चिकित्सक डाॅ.रवि धकाते यांना वरच्या स्तरावर कारवाई साठी टाळाटाळ केली जात आहे.