रेती वाहतूक करणारे आठ वाहन पकडले

0
28

तुमसर दि.१: मंजुर परवान्यापेक्षा जास्त रेती भरून वाहतूक करित असतानी आढळून आल्याने तहसिलदार व उपविभागीय अधिकार्‍यांनी वाहनांना वाटेतच अडवून त्यांच्यावर कारवाई करित ट्रकांना तुमसर पोलिसांच्या स्वाधीन करण्यात आले. ही कारवाई दि.२९ला सायंकाळी ५ वाजताच्या सुमारास देव्हाडी मार्गावर करण्यात आली.
लगतच्या मोहाडी तालुक्यातील घाटकुरडा रेती घाटावरून रेतीची वाहतूक क्षमतेपेक्षा जास्त होत असल्याची माहिती मिळाली असता तहसिलदार व उपविभागीय अधिकारी शिल्पा सोनुले यांनी संयुक्त कारवाई करत वाहनात मंजुर ३ ब्रास रॉयल्टीपेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये दिसून आल्याने या ट्रकमधील रेतीची घनता मोजून काढून ३ ब्रास पेक्षा जास्त रेती ट्रकमध्ये दिसून आले.
त्यामुळे सदर आठही ट्रक तुमसर पोलिसांच्या ताब्यात दिले.