शासकीय योजनांचा लाभ घ्या -तहसीलदार सांगळे

0
12

सालेकसा दि.२: सर्वसामान्य नागरिकांचा आर्थिक दर्जा उंचावण्यासाठी तसेच समाजात सन्मानाने जगण्याची संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासनाद्वारे विविध उपक्रम राबविले जातात. जनतेपर्यंत विविध शासकीय योजना पोहोचविल्या जातात.या योजनांचा जनतेने पुरेपूर लाभ घ्यावा, असे आवाहन सालेकसाचे तहसीलदार प्रशांत सांगळे यांनी केले.
कावराबांध येथे मंडळस्तरावरील समाधान शिबिराचे उद््घाटन जि.प. समाज कल्याण सभापती देवराज वडगाये यांच्या हस्ते तहसीलदार प्रशांत सांगळे यांच्या अध्यक्षतेखाली करण्यात आले. या वेळी अतिथी म्हणून पंचायत समिती सालेकसाचे सभापती हिरालाल फाफनवाडे, जि.प. सदस्य विजय टेकाम, पं.स. सदस्या प्रतिभा परिहार, प्रमिला दसरिया, प्राचार्य एन.टी. निर्विकार, कृषी विभागाचे मेंढे, भूमापन कार्यालयाचे मिश्रा, कावराबांधच्या सरपंच मंजू बनोटे, बिंझलीचे सरपंच सुलोचना लिल्हारे या व्यतिरीक्त पोलीस विभाग, महसूल विभाग, महावितरण विभागाचे तसेच महा ई सेवा केंद्राचे अधिकारी उपस्थित होते.
समाजकल्याण सभापती देवराज वडगाये म्हणाले, शासकीय स्तरावर सर्वसामान्य लोकांसाठी अनेक योजना राबविल्या जातात.परंतु योजनांची योग्य माहिती मिळत नसल्याने त्यांचा लाभ जनतेपर्यंत पोहचत नाही. अशावेळी संबंधित विभागाच्या अधिकारी-कर्मचार्‍यांनी आपल्या कर्तव्याचे पालन करीत जनतेला योग्य मार्गदर्शन करून लाभ मिळवून देण्याचा प्रयत्न करावा, असे ते म्हणाले.
कार्यक्रमात प्रतिभा परिहार, सभापती फाफनवाडे, निर्विकार आदींनीसुध्दा मार्गदर्शन केले.कावराबांध मंडळांतर्गत सहा महसूल कार्यालयांतर्गत २८ गावांचे महिला-पुरूष सहभागी झाले.प्रास्ताविक कावराबांधचे तलाठी आर.एम.ठाकरे यांनी केले व समाधान शिबिराचे महत्त्व सांगितले. संचालन व आभार प्रा.गणेश भदाडे यांनी केले. का