अग्रवाल सोशल मंचच्यावतीने परिचय संमेलन

0
8

गोंदिया दि.२: परिचय संमेलनाच्या माध्यमातून अविवाहित युवक-युवती एकाच मंचवर येत असल्याने विवाह प्रक्रिया अधिक सुगम होते. तर परिचय संमेलन वेळ व पैशांची बचत करण्याचे महत्त्वपूर्णमाध्यम आहे, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्य लोकलेखा समितीचे सभापती आ. गोपालदास अग्रवाल यांनी व्यक्त केले. श्री अग्रसेन स्मारक समितीच्या मार्गदर्शनात अग्रवाल सोशल मंचच्यावतीने घेण्यात आलेल्या उपवर-वधू परिचय संमेलनात ते बोलत होते.
प्रमुख पाहुणे म्हणून ट्रस्ट बोर्ड अध्यक्ष मोहन चांगरोडिया, महिला समिती अध्यक्ष ज्योती इसरका, युवा समिती अध्यक्ष गौरव अग्रवाल व स्मारक समिती सचिव सुशील सिंघानीया उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार अग्रवाल यांच्या हस्ते स्मरणिकेचे प्रकाशन करण्यात आले. तसेच समाजातील वरिष्ठ सदस्य, बाहेरून आलेले पाहुणे व समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार याप्रसंगी करण्यात आला.
या परिचय संमेलनाला छत्तीसगड, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, उडीसा व विदर्भातील अग्रवाल समाजबांधव मोठय़ा संख्येत उपस्थित होते. प्रास्तावीक अग्रवाल सोशल मंचचे अशोक अग्रवाल यांनी मांडले. कार्यक्रमासाठी सोशल मंच सचिव घीसूराम अग्रवाल, कोषाध्यक्ष नरेश अग्रवाल, वरिष्ठ पदाधिकारी सुरेश चांगरोडिया व समाजबांधवांनी सहकार्य केले.