देवरीत आ.पुराम यांच्या हस्ते विकासकार्याचे भूमिपूजन

0
16

देवरी दि.२: मागील एक वर्षाआधी झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या वेळी देवरी नगरवासीयांना दिलेल्या आश्‍वासनची पूर्तता करत आमगाव-देवरी विधानसभा क्षेत्राचे आ. संजय पुराम यांनी ५0लाख रुपयांच्या विकासकार्याचे भूमिपूजन देवरी येथील सर्वच प्रभाग भाजपचे तालुकाध्यक्ष प्रमोद संगीडवार यांच्या अध्यक्षतेखाली केले.यावेळी भाजपचे जिल्हा महामंत्री विरेंद्र अंजनकर, सविता पुराम, प्रवीण दहीकर, सोनू चोपकर, लक्ष्मण सोनसर्वे, छोटू भाटीया, विलास शिंदे, कौशल्या कुंभरे, भूषण मस्करे, भाटिया व अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
यात विविध मार्गाचे सिमेंटीकरण, सभामंडप आणि नाली बांधकाम आहे.प्रभाग १मध्ये बागडे गुरूजी यांच्या घराजवळील मार्ग, प्रभाग २मध्ये प्रदीप पोटवार यांच्या घराजवळील मार्ग, प्रभाग ४मध्ये भरतराज हलमारे यांच्या घराजवळील मार्ग व नाली बांधकाम, प्रभाग ९मध्ये राजू लांडेकर यांच्या घराजवळ सभा मंडप, प्रभाग १0 मध्ये बिसेन यांच्या घराजवळील मार्ग, प्रभाग १२ व १३मध्ये निलकंठ पडोळे यांच्या घराजवळील संयुक्त मार्ग, प्रभाग १४मध्ये मनोहरभाई पटेल विद्यालयाच्या बाजूचा मार्ग आणि १५ मध्ये मागचा मार्ग, प्रभाग १६ मध्ये अशोक राऊत यांच्या घराजवळील मार्ग, प्रभाग १७ मध्ये परसटोला येथील नालीबांधकाम आणि बसस्थानकाचे भूमिपूजन अशा अनेक ठिकाणचे कामे होणार आहे.