कोसरे कलार समाजाचा मेळावा २० डिसेंबर रोजी

0
22

गोंदिया ,दि.१०- युवा कोसरे कलार समाज संस्थेच्या वतीने समाज मेळावा, विवाह योग्य युवक-युवती परिचय मेळावा, इयत्ता दहावी व बारावीतील गुणवंत विद्याथ्र्यांचा सत्कार समारोह २० डिसेंबर रोजी आयोजित करण्यात आला आहे. समाजातील विवाह योग्य युवक-युवतींच्या पाल्यांनी व गुणवंत विद्याथ्र्यांच्या नावनोंदणीला सुरुवात झाली असून नाव नोंदणी व अधिक माहितीकरिता संस्थेच्या कार्यालयात संपर्क साधण्याचे आवाहन तिर्थराज उके, दिनेश फरकुंडे, मुलचंद फरकुंडे, सतीश मेश्राम, गुड्डू मेश्राम, अशोक मानकर, परमेश्वर कावळे, उमेश शहारे, जी. बी. मेश्राम, भोजराज दरवडे, संतोष शहारे, बालू कोसरकर, रमेश मेश्राम आदींनी केले आहे.