मुलाखत तंत्र विषयावर व्याख्यान

0
21

गोंदिया-येथील मनोहरभाई पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी येथे प्राचार्य डॉ. नितीन इंदूरवाडे यांच्या मार्गदर्शनाखाली ‘मुलाखत तंत्रङ्क या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी स्वप्निल जमईवार यांनी, मुलाखत तंत्राच्या विविध बाबीची माहिती देतांना मुलाखतीसाठी इंग्रजी भाषेचे ज्ञान, गणवेशाचे महत्त्व, व्यक्तिमत्त्व, शैक्षणिक पात्रता, सामान्य ज्ञान, बोलण्याची कला आदीबद्दल मार्गदर्शन केले. तसेच स्पर्धा परीक्षेच्या तयारीसह मुलाखतीसाठी तयारी कशी करावी, कोणत्या पुस्तकांचे वाचन करावे, तज्ज्ञांचे मार्गदर्शन याची माहिती दिली. कार्यक्रमाला प्रा. सुनील चौधरी, प्रा. मिश्रा, प्रा. पुरोहित, प्रा. पूनम भांगे प्रामुख्याने उपस्थित होते. प्रास्ताविक डॉ. परिमल काटोलकर यांनी केले. आभार प्रा. अजय डोंगरवार यांनी मानले. आयोजनासाठी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाèयांनी सहकार्य केले