बिहार विधानसभेच्या पहिल्या टप्प्यात 57 टक्के मतदान

0
5

वृत्तसंस्था

नवी दिल्ली, दि. १२ – बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज एकूण ५७ टक्के मतदान झाले. पहिल्या टप्प्यात १० जिल्ह्यांतील ४९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले.
मतदानाला सकाळी सात वाजल्यापासून सुरुवात झाल्यानंतर दहावाजेपर्यंत २० टक्के मतदान झाले होते. त्यानंतर तीन वाजेपर्यंत ५२ टक्के झाले, तर सायंकाळी ५ वाजता मतदान करण्याची वेळ संपल्यानंतर एकूण ५७ टक्के मतदान झाल्याने निवडूक अधिका-यांनी सांगितले.

दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची जोरदार प्रचार मोहीम आणि मुख्यमंत्री नितीशकुमार व लालूप्रसाद यादव यांच्या नेतृत्वाखालील प्रतिस्पर्धी गटाने घेतलेल्या प्रचार सभांनंतर पाच टप्प्यांमध्ये होणाऱ्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात आज ४९ उमेदवारांचे भवितव्य मतपेटीत बंद झाले. पहिल्या टप्प्यात ४९ मतदारसंघांसाठी ५८३ उमेदवार रिंगणात उतरले असून यामध्ये ५४ महिलांचा समावेश आहे.

निवडणुकी दरम्यान, जमुई येथे एनडीए आघाडीतील लोकजनशक्ती पक्षाचे उमेदवार विजयसिंह यांच्यावर महेश्वरी गावात हल्ला झाला. हल्लेखोरांनी लोकजनशक्ती पक्षाच्या उमेदवारावर गोळीबार केला. घटनेनंतर पोलिसांनी एका आरोपीला अटक केली आहे. एलजीपीचे उमेदवार या हल्ल्यात थोडक्यात बचावले आहे