पुस्तोडे आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू

0
7

अर्जुनी मोरगाव,दि.१६-तालुक्यातील देवलगाव येथील नत्थूजी पुस्तोडे अनुदानित आदिवासी आश्रमशाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झाल्याची गुरुवारी (ता.१५) रात्री १० वाजता दरम्यान घडली.सदर विद्यार्थिनीला गोंदिया येथे उपचारासाठी नेताना वाटेतच मृत्यू झाला. त्या विद्यार्थिनीचे नाव कविता मंगल कुंजााम असे आहे.
मृतक कविता ही मूळची देवरी तालुक्यातील धमदीटोला येथील रहिवासी आहे. अकारावी विज्ञान शाखेची विद्यार्थिनी होती. ९ ऑक्टोबर रोजी स्वगावी गेली होती. गुरुवारला सायंकाळी आश्रमशाळेत परत आली. सायंकाळी तिने शाळेतच भोजन केले. त्यानंतर गावी गेलेल्या कालावधीचा अभ्यास व गृहपाठ घेऊन ती अभ्यासाला बसली. रात्री सुमारे ८ वाजे दरम्यान अचानक तिची प्रकृती बिघडली. तिला नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले. तिथे प्राथमिक उपचार घेतल्यानंतर डॉक्टरांनी गोंदिया येथे हलविण्याचा सल्ला दिला.गोंदियाला नेत असतानाच डव्वा गावाज‹वळ तिची प्राणज्योत मालवल्याचे परिचारिकेच्या लक्षात येताच सडक अर्जुनी येथील ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधिकाèयांशी चर्चा केली.
त्यानंतर रुग्णालयात घेऊन गेल्यानंतर तपासणी करताच डॉक्टरांनी कविताला मृत जाहीर केले.
सडक अर्जुनी येथेच शवविच्छेदन करण्याची माागणी करण्यात आली. मात्र वाटेत मृत्यू झाला असल्याने वैद्यकीय अधिकाèयांनी नकार दर्र्शविला. त्यानंतर कविताचे शव नवेगावबांध ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले. शुक्रवारला (ता.१६) सकाळी शवविच्छेदनाची प्रक्रिया सुरू करावयाची होती. मात्र महिला डॉक्टर नसल्याने गोंदिया येथून महिला वैद्यकीय अधिकाèयाला पाचारण करण्यात आले. मात्र उशिरापर्यंत त्या पोहोचल्या नाहीत. शेवटी सडक अर्जुनी येथील डॉक्टर शवविच्छेदनसाठी येणार होते. मात्र पोलीस संरक्षण नसल्याने त्यांनी येण्यास नकार दर्शविला. यात बराच वेळ निघून गेला. शेवटी पावणे चार वाजता कविताची उत्तरीय तपासणी करण्यात आली.त्यानंतर कविताचा मृतदेह वडिलाच्या सुपूर्द करण्यात आले.