बुध्दांच्या अस्थीधातू कलशाचे पालकमंत्र्यांनी केले स्वागत

0
22

गोंदिया, १६ : श्रीलंकेवरुन आणलेल्या तथागत गौतम बुध्दांच्या अस्थीधातू कलशाचे गोंदिया शहरात आगमन होताच पालकमंत्री राजकुमार बडोले यांनी आज (ता.१६) संथागार बुध्द विहारात स्वागत केले.
यावेळी अस्थीधातू कलशासोबत श्रीलंकन भंते वास्कादुवे महिंदा थेरो, भंते हप्पूत्तले, भंते पन्ना रामा थेरो, श्रीलंकेतील बुध्द विचारवंत बंदुला वीरवर्धना, सिरी सिध्दार्थ गौतम बुध्द या आगामी चित्रपटाचा अभिनेता गगन मलिक उपस्थित होते. संथागार बुध्द विहारात आगमन होताच बौध्दबांधवानी तथागत गौतम बुध्द आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जयघोष केला. उपस्थितांनी अस्थीकलशाचे दर्शन घेतले. बुध्दवंदना घेण्यात आली. यावेळी भंते डॉ. मेत्तानंद यांचेसह नागपूर येथून आलेले अन्य भंते उपस्थित होते. संथागारचे प्रा. नागदेवे यांनी उपस्थितांचे स्वागत केले. गोंदिया शहरात अस्थीधातू कलश रॅली पालकमंत्री राजकुमार बडोले पूर्णवेळ सहभागी होते. अस्थीधातू कलश रॅली डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, छोटा गोंदिया, गोंविदपूर, संथागार विहार, मैत्रेय विहार या मार्गाने मार्गक्रमण करीत गेली. रस्त्याच्या दुतर्फा उभ्या असलेल्या नागरिकांनी अस्थीकलशाचे दर्शन घेऊन पुष्प वाहीली.