मुख्यमंत्र्यांची संघ गणवेशात कार्यक्रमाला हजेरी

0
9

नागपूर दि.२२-:- दसऱ्यानिमित्त राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या (आरएसएस) पथसंचलनाच्या कार्यक्रमाला आज (गुरुवार) मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, केंद्रीय वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी संघगणवेशात हजेरी लावली. संघाच्या 90 व्या वर्धापनदिनानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही स्वयंसेवकांना शुभेच्छा दिल्या आहेत.

दरवर्षीप्रमाणे यंदाही नागपुरात पथसंचलनाचा कार्यक्रम उत्साहात पार पडला. दसऱ्याच्या दिवशी संघ संघ मुख्यालयामध्ये शस्त्रपूजनाचा कार्यक्रम केला जातो. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नितीन गडकरी डीआरडीओच्या माजी संचालक विजयकुमार सारस्वत यांनी हजेरी लावली. हे सर्वजण संघाच्या गणवेशात उपस्थित होते.