उपजिल्हाधिकारी परातेला रुजू करण्यास बार्टीची ना

0
6

नागपूर दि.30-: विदर्भातील एका अधिकाऱ्याची दीड महिन्यांपूर्वी पुणे येथील बार्टीच्या संचालकपदी बदली झाली. मुख्यमंत्र्यांनी बदलीचे आदेश देऊन आणि तातडीने रुजू करून घेण्याचे निर्देश दिले. परंतु सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत येणाऱ्या बार्टीतर्फे मुख्यमंत्र्यांच्या आदेशाला केराची टोपली दाखविण्यात आली असून दोन महिने होत आले तरी संबंधित अधिकाऱ्याला रुजूच करण्यात आले नसल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

चंद्रपूर येथील उपजिल्हाधिकारी चंद्रभान पराते यांची डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (बार्टी) पुणेच्या प्रकल्प संचालकपदी प्रतिनियुक्तीवर बदली करण्यात आली आहे.
पुणे येथे बार्टीच्या कार्यालयात रुजू होण्यासाठी गेले असता त्यांना सध्या जागा रिक्त नसल्याचे सांगण्यात आले. दोन महिने होत आले. परंतु अजूनही पराते यांना रुजू करण्यात आलेले नाही. पराते ज्या जागेवर होते, तेथून त्यांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. तर जागा खाली नाही म्हणून सामाजिक न्याय विभागाने त्यांना रुजू करून घेतलेले नाही.