चंद्रपूर जिल्ह्यात 420 गावांना अद्यापही एसटीची प्रतीक्षा

0
8

चंद्रपूर दि.30: ‘प्रवाशांच्या सेवेसाठी, गाव तेथे एसटी’ ही योजना राज्य परिवहन महामंडळामार्फत राबविली जात आहे. मात्र, जिल्ह्यातील तब्बल ४२० गावांमध्ये स्वातंत्र्याच्या ६६ वर्षांनंतरही एसटीची बस पोहचली नसल्याचे वास्तव आहे. त्यामुळे या गावातील नागरिकांना आजही खाजगी वाहनाने किंवा पायी प्रवास करावा लागत आहे.

चंद्रपूर जिल्हा जंगलव्याप्त आहे. कोरपना, जिवती, राजुरा आदी तालुक्यातील गावे पहाडीवर वसलेले आहेत. या गावातील नागरिकांना शासनाच्या सोयीसुविधा पुरवण्याचे काम प्रशासनस्तरावरुन सुरु आहे. मात्र, दुर्गम भागातील गावांमध्ये आजही प्रशासनाच्या सोयीसुविधा पोहचू शकलेल्या नाहीत. जिल्ह्यात एकूण १६७३ गावे आहेत. यात फक्त १ हजार २३३ गावांमध्ये एसटी बस सरू करण्यात आली आहे. दुर्गम भागात पहाडावर असलेल्या गावातील नागरिकांनी आपल्या गावात एसटी बससेवा सुरू व्हावी, यासाठी प्रशासनाकडे वारंवार पाठपुरावा केला. मात्र, बससेवा सुरू करण्यात येत असलेल्या अडचणींमुळे अद्याप ४२० गावांमध्ये बससेवा सुरू होऊ शकलेली नाही.