प्राथमिक आरोग्य केंद्राला ३0 खाटांच्या रुग्णालयाचा दर्जा द्या

0
30

एकोडी : गोंदिया तालुक्यातील एकोडी हे गाव जवळपास ४0 ते ४९ गावांचे केंद्र गाव आहे. त्यातल्यात्यात एकोडी हे गाव गोंदिया- तिरोडा या मुख्य मार्गावर असल्याने येथील आरोग्य संस्थेच्या बाह्यरूग्ण सेवेत रूग्णांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या ठिकाणी प्राथमिक आरोग्य केंद्राची प्रशस्त इमारत तयार करण्यात आली आहे. मात्र, कमी मनुष्यबळामुळे नेहमीच या केंद्रातील आरोग्य सेवेचे धिंदवडे उडत राहतात. त्यामुळे एकोडी येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला ३0 खाटांचा रूग्णालयाचा दर्जा देण्यात यावा, अशा मागणीचे निवेदन ग्रा.प.पदाधिकारी व ग्रामवासीयांनी पालकमंत्री नवाब मलिक यांना दिले.
एकोडी हे गाव केंद्र असून या गावाच्या परिसरात दांडेगाव, धामनेवाडा, सहेषपूर, पैकाटोला, गंगाझरी, मजितपूर, खळबंदा, खर्रा, किंडगीपार, डोंगरगाव, सेजगाव, कोहका, पारडीबांध, खातीटोला, झालुटोला, सेजगाव, बेरडीपार, काचेवानी, सिंदीटोला, डब्बेटोला, रामाटोला यासारखे जवळपास ४0 ते ४९ गावे आहेत. या गावातील नागरिकांची नेहमीच एकोडी येथे वर्दळ असते. त्यातल्यात्यात एकोडी हे गाव गोंदिया – तिरोडा या मुख्य मार्गावर असल्याने या गावात आरोग्य सेवेसाठी परिसरातील नागरिकही येत असतात. मात्र, प्राथमिक आरोग्य केंद्र आरोग्य सेवा पुरविण्यात कमी पडत आहे. याकरीता प्राथमिक आरोग्य केंद्राचे रूग्णालयात रूपांतर करून दर्जा वाढ करण्यात यावी, अशा मागणीचे निवेदन ग्रा.पं. पदाधिकार्‍यांच्या वतीने पालकमंत्री मलिक यांना देण्यात आले.
यावेळी सरपंच शालुताई चौधरी, उपसरपंच अंबुले, ग्राम पंचायत सदस्य अजाब रिनायत, राकेश बिसेन, शुभम बोदेले, दिपक रिनायत, वहिदा शेख आदि उपस्थित होते.