भारतीय राज्यघटनेतून लोधी समाजाचे कल्याण – प्रा. डॉ. चंद्रकिर्ती

0
25

▪️ अवंतीबाई लोधी महासभा देणार लोधी समाजातील गरीब आणि हुशार मुलांच्या शिक्षणासाठी प्रोत्साहन- शिव नागपुरे

▪️अमर शहीद वीरांगना राणी अवंतीबाई लोधी जयंतीनिमित्त पुतळ्याचे अनावरण आणि शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न

गोंदिया,दि.20:- अमर शहीद वीरांगणा महाराणी अवंतीबाई लोधी जयंतीनिमित्त सहेसपूर (गंगाझरी) गावात उत्साहाने राणी अवंतीबाईच्या पुतळ्याचे अनावरण आणि शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रम संपन्न झाला. कार्यक्रमाची सुरवात पारंपारिक क्षत्रिय वेशभूषेत महिला शक्तीने सादर केलेल्या शोभायात्रेने झाली. त्यानंतर राणी अवंतीबाई लोधी पुतळ्याचे अनावरण करण्याचा कार्यक्रम अनेक आमंत्रित निमंत्रीत मान्यवरांच्या हस्ते पार पडला.

या निमित्ताने विशेषतः विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक मार्गदर्शन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. ज्यात बौद्ध भदंत प्रा. डॉ.चंद्रकित्ती जी मार्गदर्शन करताना म्हणाले की “लोधी समाजाचे कल्याण फक्त भारतीय राज्यघटनेनेच होऊ शकते, तुम्हाला तुमच्या अधिकारांची जाणीव असावी, लोधी समाज हा एक असा समाज आहे जो शेतात काबाड कष्ट करतो. शिक्षणाकडे पूरेसा लक्ष नाही. भाकरी कमी खा पण भावी पिढीला अगदी कठीण परिस्थितीतही शिक्षण क्षेत्रात पुढे घेऊन येण्यास प्रोत्साहन द्या, या समाजातुनही डॉ.बाबासाहेब आंबेडकरांसारखे विद्वान विद्यार्थी घडु द्या”. अवंतीबाई लोधी महासभेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रतिमा दानदाता लोधी शिव नागपुरे म्हणाले की, स्वातंत्र्याच्या लढ्यात प्रथम स्वातंत्र्य सेनानी अमर शहीद वीरांगना राणी अवंतीबाई लोधी यांचे बलिदान शतकानुशतके विसरता येणार नाही. त्यांच्या स्मृती प्रित्यर्थ गरिब होतकरू मुले दत्तक घेतले जातील आणि त्यांच्या शिक्षणाचा खर्च उचलल्या जाईल. आज शरद घनश्याम पताहे या गरिब हुशार विद्यार्थ्याला आम्ही पूढिल शिक्षणाकरीता दत्तक घेत आहोत”.

विशेष अतिथी म्हणून अवंतीबाई लोधी महासभेचे राष्ट्रीय सल्लागार आचार्य पूरन सिंह जी यावेळी म्हणाले की, “लोधी समाजाचा इतिहास संघर्षांनी भरलेला आहे, त्याच्या साहसी इतिहासापासून प्रेरणा घेऊन समाजाने आपल्या हक्कांबद्दल जागरूक राहून स्वतंत्र भारतातील संसदे कडे मार्गक्रमण करावा” यावेळी अवंतीबाई लोधी महासभेचे राष्ट्रीय प्रवक्ते अभियंता मुनेश लोधी, राष्ट्रीय सचिव लोधी मुनेंद्र सिंह नरवरिया, संविधान मैत्री संघाचे संयोजक अतुल सतदेवे, राष्ट्रीय महिला संघटक शिला नागपुरे, महिला सशक्तीकरण संघच्या सरोज राजवर्धन, सुरेखा प्रसन्नजीत, प्रिया शहारे, पौर्णिमा नागदेवे , पुरुषोत्तम मोदी, उमेश दमाहे, सरपंच हितेश पताहे आदी प्रमुखतेने उपस्थित होते. कार्यक्रमाच्या सुरुवातीला विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत स्वागत गीत, लेझिम ताल प्रस्तुत केला. कार्यक्रमाच्या शेवटी मुला मुलींचे सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन अध्यक्ष लोधी शिव नागपुरे यांनी केले व उपस्थितांचे आभार गावातील ज्येष्ठ नागरिक चैनलाल नागपुरे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी पुतळा अनावरण समितीचे अध्यक्ष चैनलाल नागपुरे, घनश्याम पताहे, राजकुमार पताहे, रोशनलाल नागपुरे, हरिकिशन नागपुरे, केशोराव बिरनवार, युवराज बिरनवार, हंसलाल पताहे, मधुकर ठकरेले, बसंत नागपुरे, मार्कंड नागपुरे, राधेश्याम बिरनवार रानी अवंतीबाई महिला समितीच्या अध्यक्ष शेषाबाई पताहे, रेणुकाबाई नागपुरे, जयवंता नागपुरे, कविता मोहारे, दुर्गेश्वरी नागपुरे, लीला बिरनवार, चंपाबाई नागपुरे, नंदेश्वरी ठकरेले, दम्यंता नागपुरे, मीरा लिल्हारे, धनवंता नागपुरे, मुनेश्वरी नागपुरे, संगीता नागपुरे , सुनीता नागपुरे, झुमा बिरनवार, माया बिरनवार, बबिता पताहे, चंद्रवंती नागपुरे, बसंती लिल्हारे, सावन सुलाखे, सायवंता बंभारे, वैशाली पताहे,, कविता पताहे, ललिता नागपुरे, हस्तिका लिल्हारे व समस्त सहेसपूर ग्रामवासियानी कार्यक्रम यशस्वीतेकरिता प्रयत्न केले.