ओबीसी चळवळीचे कार्यकर्ते रुचीत वांढरे यांचे निधन

0
68

गडचिरोली,दि.26ः- गडचिरोली जिल्ह्यातील ओबीसी चळवळीतील युवा तडफदार कार्यकर्ते राष्ट्रीय ओबीसी युवा महासंघाचे विदर्भ संघटक रुचीत वांढरे यांचे आज गुरुवारला अल्प आजाराने निधन झाले.त्यांची अंत्ययांत्रा दुपारी 1 वाजता त्यांच्या गोकुळनगर निवासस्थान येथून निघणार असून कठाणी नदीघाटावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.रुचितच्या आकस्मिक निधनाबद्दल ओबीसी चळवळीतील अनेकांनी हळहळ व्यक्त केली आहे.